health
एकदम झकास! मेंदू, दात, डोळे, त्वचेसाठी पेरू आहे गुणकारी
सध्या सोलापूरसह अन्य भागात पेरूची आवक वाढली आहे. पेरूचे अनेक फायदे आहेत. जर तुम्हाला पोटदुखीचा त्रास होत असेल किंवा पचनाशी संबंधित समस्या असतील तर रोज एक पेरू खाणे सुरू करा. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारेल. यासोबतच सकाळी पोटही सहज साफ होते.
जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर तुम्ही आहारात पेरूचा समावेश केला पाहिजे. पेरूमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहे. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
पेरू त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे.
पेरूमध्ये अँटी ऑक्सिडेंट गुणधर्म असतात, ज्यामुळे ते फ्री रॅडिकल्सशी लढते. तुम्हाला जास्त भूक लागली असेल किंवा गोड खाण्याची इच्छा असेल तर पेरू खाण्यास सुरुवात करा. ते खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेले राहते आणि तुम्हाला काही खाण्याची इच्छा होत नाही.