india worldmaharashtratop news

BSNL च्या ‘या’ प्लॅनने Jio-Airtel ची डोकेदुखी वाढली, जाणून घ्या

युजर्स Jio-Airtel च्या दरवाढीला कंटाळले

BSNL चे युजर्स असाल तर ही बातमी नक्की वाचा. BSNL ही देशातील सरकारी टेलिकॉम कंपनी आहे. खासगी टेलिकॉम कंपन्यांनी आपल्या रिचार्ज प्लॅनच्या किंमती वाढवल्या असल्या तरी BSNL अजूनही आपल्या स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी ओळखली जाते. BSNL आपल्या कमी किमतीच्या रिचार्ज प्लॅनसाठी प्रसिद्ध असून त्याच्या युजर्सची संख्या कोट्यवधींमध्ये आहे. दरम्यान, याच BSNL कंपनीमुळे आता जिओ आणि एअरटेलसह व्होडाफोन-आयडियाचे देखील टेन्शन वाढले आहे.

जिओ, एअरटेल, Vi चे टेन्शन वाढले

BSNL आपल्या युजर्सला वेगवेगळ्या किमतीच्या रेंजमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करते, हे तुम्हाला माहिती आहे. वेगवेगळ्या बेनिफिटसह हे प्लॅन येतात. आज आम्ही तुम्हाला BSNL च्या एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत. या प्लॅनमुळे जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियासाठी टेन्शन वाढले आहे.

BSNL रिचार्ज प्लॅन

BSNL आपल्या युजर्सना वेगवेगळ्या किमतीच्या रेंजमध्ये अनेक रिचार्ज प्लॅन ऑफर करते, जे वेगवेगळ्या बेनिफिटसह येतात. आज आम्ही तुम्हाला BSNL च्या एका प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जो जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियासाठी टेन्शन आहे.

BSNL चा 35 दिवसांचा सर्व्हिस प्लॅन

BSNL च्या रिचार्ज प्लॅनची किंमत 107 रुपये आहे. हा प्लॅन सर्वात कमी किंमतीत 35 दिवसांसाठी सेवा देतो. या प्लॅनमध्ये युजर्संना 35 दिवसांची वैधता आणि संपूर्ण वैधतेदरम्यान 200 मिनिटे मिळतात, ज्याचा वापर तुम्ही कोणत्याही नेटवर्कवर कॉल करण्यासाठी करू शकता.

BSNL च्या 107 रुपयाच्या या प्लॅनसोबत युजर्संना BSNL ट्यूनची मोफत सुविधाही मिळते. डेटाबद्दल बोलायचे झाले तर युजरला एकूण 3GB डेटा मिळतो, ज्याचा वापर तुम्ही इंटरनेट वापरण्यासाठी करू शकता.

 

 

युजर्स दरवाढीला कंटाळले

काही काळापूर्वी देशातील खासगी टेलिकॉमने आपल्या टॅरिफ प्लॅनच्या किंमती वाढवल्या होत्या. दरवाढीमुळे त्रस्त झालेल्या अनेकांनी कंपन्यांच्या या निर्णयावर टीका केली. तसेच मोठ्या संख्येने युजर्सने आपला नंबर BSNL ला पोर्ट करण्याबाबत सांगितले आणि अनेक युजर्सने तसे केले. BSNL देशभरात आपली सेवा सुधारण्यासाठी काम करत आहे.

Related Articles

Back to top button