भारताच्या विजयानंतर गावसकरांचा आनंद गगनात मावेना

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter
  1. भारतीय संघाने टी-२० विश्वचषकाची सुरुवात दणक्यात केली. या सामन्यात विराट कोहली आणि हार्दिक पांड्या या सलामीवीर जोडीने उत्कृष्ट कामगिरी केली.
  2. भारताने पाकिस्तानचा चार गडी राखून पराभव केला. कोहलीने ८२ धावांची खेळी केली.
  3. तर पांड्यानं तीन विकेट आणि ४० धावांची कामगिरी केली. तसेच अर्शदीपने सुद्धा ३ विकेट्स घेतल्या. भारताच्या विजयात त्याचाही मोलाचा वाटा होता. भारतीय संघाच्या विजयानंतर देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला.
  4. दरम्यान, या विजयानंतर माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर, के श्रीकांत आणि इरफान पठाण यांनी जल्लोष साजरा केला.
  5. गावसकरांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये सुनील गावसकरांच्या अंगात लहान मुलं संचारल्यासारखं पाहायला मिळत आहे.
  6. या व्हिडीओत गावसकर लहान मुलांसारख्या उड्या मारताना दिसत आहेत. त्यांनी स्टेडियममधील व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. यामध्ये इरफान पठाण आणि श्रीकांत यांच्यासोबत ते सामन्याचा आनंद घेताना दिसत आहेत. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon