health
एकच नंबर! थंडीत नारळ पाणी पिण्याचे आश्चर्यकारक फायदे
सध्या सर्वत्र थंडीचे प्रमाण वाढत आहे. सोलापुरात ही गुलाबी थंडी पडत आहे. हिवाळ्यात नारळ पाणी पिणे शरीरासाठी फायदेशीर ठरते. विशेषतः रिकाम्या पोटी नारळ पाणीचे सेवन केल्यास अनेक फायदे आपल्याला मिळतात. नारळाच्या पाण्यात पोटॅशियम, मॅग्नीज व विटामिन सी अशी पोषक तत्वे असतात. हिवाळ्यात नारळ पाणीचे सेवन केल्यास रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
तसेच अनेक व्हायरसपासून आपले संरक्षण होते. नारळाच्या पाण्यात भरपूर पोटॅशियमचे प्रमाण असते, यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. नारळाचे पाणी पिल्यास शरीराला पाण्याची कमतरता भासत नाही. हिवाळ्यात त्वचेची संबंधित समस्या उद्भवतात. मात्र नारळाचे पाणी पिल्याने त्वचा निरोगी राहते. नारळ पाणी तुमच्या त्वचेला पोषण देण्याचे काम करते.