maharashtra

चार वेळा देऊनही उपमुख्यमंत्री पद अन्याय झाला असे म्हणणे कितपत योग्य – शरद पवार

पुणे, 20 नोव्हेंबर (हिं.स.)। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती तालुक्यातील माळेगाव बुद्रुक येथील मतदान केंद्रावर ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सकाळी नऊ वाजता कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला. यावेळी बोलताना ते म्हणाले महाराष्ट्राच्या सत्तेत अनेकदा आणि राज्याचे उपमुख्यमंत्री चार वेळा देऊनही अजित पवारांवर अन्याय झाला असे म्हणणे कितपत योग्य आहे, अशा पद्धतीचा सवाल शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

अजित पवार यांच्या मातोश्री आशाताई पवार यांनी बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सांगता सभेत अजित पवार यांच्यावर अन्याय झाला, अशा पद्धतीचा खुलासा केला होता, त्यामुळे त्या मुद्द्याला अनुसरून शरद पवार बोलत होते. शरद पवार यांनी भारतीय जनता पार्टीच्या कुटील राजनीतीचा सातत्याने उल्लेख करीत महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळी दिशा लागल्याचे स्पष्टपणे बोलून दाखवले. सुप्रिया सुळे यांच्यावर ज्या व्यक्तीने आरोप केले तो व्यक्ती कसा आहे याची चौकशी करावी. त्याला अधिकचे काही महत्त्व देण्याची आवश्यकता नाही. माजी मंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेला हल्ला हा दुर्दैवी प्रकार आहे

Related Articles

Back to top button