टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

स्वस्थ आरोग्यासाठी दररोज खा आवळा

On: December 5, 2022 10:08 AM
Follow Us:

आवळा एक आयुर्वेदिक औषधी फळ आहे. याचा वापर अनेक आधुनिक औषधी बनवण्यासाठी केला जातो. आवळा अनेक आजार बरे करण्यासाठी उपयोगी आहेच शिवाय त्वचा आणि केसांसाठी त्याचे फायदे आहेत. आरोग्याच्या समस्यांवर उपचार करण्यासाठी आवळ्याचा वापर अनेक औषधे आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये केला जातो.
आवळ्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते. नियमितपणे आवळा खाल्ल्याने हृदयविकारांपासून बचाव होऊ शकतो. आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी एथेरोस्क्लेरोसिस सारख्या आजारांना देखील शरीरापासून दूर ठेवते, या आजारात चरबी, कोलेस्टेरॉल सारखे हानिकारक पदार्थ रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ लागतात.
आवळ्यात असलेल्या व्हिटॅमिन सीमुळे शरीरातील अनेक पेशी प्रक्रियांना गती मिळते आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. याव्यतिरिक्त व्हिटॅमिन सी देखील एक अँटिऑक्सिडेंट आहे, जे शरीरावरील सूज आणि लालसरपणा कमी करण्यास मदत करते.
ज्यांना तोंडाच्या फोडांचा त्रास आहे त्यांच्यासाठी आवळा फायदेशीर आहे. अशा लोकांनी आवळ्याच्या रसाचे सेवन करावे. तसेच आवळा खाल्ल्याने दात आणि हिरड्या मजबूत होतात. आवळा हा शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी रामबाण उपाय आहे. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते आणि त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. हिवाळ्यात आवळा खाणे आरोग्यासाठी चांगले असते.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

पंढरपूर तालुक्यात मोठी दुर्घटना; कठडा कोसळून ४ मजुरांचा मृ्त्यू

मोठी बातमी! दुष्काळात शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज, केंद्र सरकारची सर्वात मोठी घोषणा, घेतला मोठा निर्णय

Supriya Sule : दादा, आजच्या दिवशी तुझं नसणं हे..भाऊबीजेच्या दिवशी सुप्रिया सुळेंनी खास अजितदादांसाठी लिहिली काळजाला भिडणारी पोस्ट

Rohit Pawar Ujani Dam: पाणी अन् वीज खाणारा, गुजरातने नाकारलेला प्रकल्प नकोच; रोहित पवार,धैर्यशील मोहिते पाटलांचा इशारा

Solapur DCC Bank Election : सोलापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने खाते उघडले; बार्शी, मोहोळ, मंगळवेढ्यातील तीन जागा बिनविरोध, कुणाचा झाला विजय?

NSUI सोलापूरच्या प्रयत्नाला यश | सोलापूर विद्यापीठाने केली परीक्षा फी माफ.