Sunday, September 8, 2024
Homemaharashtraआज संकष्टी चतुर्थी आहे, मोदींचे मराठीतून भाषण

आज संकष्टी चतुर्थी आहे, मोदींचे मराठीतून भाषण

महाराष्ट्राला आज 11 विविध प्रकल्प मिळाले. महाराष्ट्रातील डबल इंजिनचं सरकार किती वेगाने काम करतय याचं हे उत्तम उदाहरण आहे. समृद्धी महामार्गामुळे मुंबई आणि नागपूरमधील अंतर कमी होईलचं पण हा महामार्ग महाराष्ट्रातील 24 जिल्ह्यांना आधुनिक कनेक्टिव्हीटीने जोडणार आहे.

यामुळे शेतकऱ्यांना, पर्यटकांना आणि विविध धार्मिक स्थळांना भेट देणाऱ्या भक्तांना लाभ होणार आहे, रोजगार उपलब्ध होणार आहे, म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राज्यातील शिंदे सरकारचे कौतुक केले आहे. मोदींच्या हस्ते आज नागपूरमध्ये महाराष्ट्रातील विविध 11 प्रकल्पांचं उद्धाटन करण्यात आले. या प्रकल्पांच्या उद्धाटनाप्रसंगी मोदींनी नागपूरकरांना संबोधित केले. यावेळी भाषणाची सुरुवात करण्यापूर्वी मोदींनी नागपूरच्या टेकडीच्या गणपतीला वंदन केले. मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून केली.
देशातील जनतेला राजकारणातील विकृत प्रवृत्तीपासून सावध राहण्याचे आवाहन करतो. शॉर्टकटच्या राजकारणाने देशाची प्रगती होणार नाही. राजकीय स्वार्थासाठी देशातील जनतेचे पैसे लुटण्याची विकृती प्रकृती राजकारणात आली आहे. शॉर्टकट वापरणारे राजकीय नेते, पक्ष देशातील करदात्याचे सर्वात मोठे शत्रू आहेत. 

त्यांचा उद्देश केवळ सत्तेत येणे हा असतो. त्यांचे लक्ष खोटी आश्वासने देत फक्त सरकार हडपणे हा असतो. ते केव्हाच देशाची प्रगती करु शकत नाही. आज भारत 25 वर्षांचं लक्ष ठेऊन काम करत आहे, अशा वेळी काही राजकीय पक्ष भारताची अर्थव्यवस्था उद्धस्त करू इच्छित आहेत, असा आरोपही मोदींनी विरोधकांवर केला आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments