सुमित करांडे यांचा जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश
सांगोला /प्रतिनिधी : माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शेकापचे दिवंगत नेते स्वर्गीय बाबासाहेब करांडे यांचे सुपुत्र सुमित बाबासाहेब करांडे यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यापुढील काळात भाजपचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुमित करांडे यांनी सांगितले. पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांना पक्षात सन्मानाची वागणूक देणार असल्याचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी सांगितले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार-सावंत यांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिल्ह्यात भाजपचे मजबूत संघटन निर्माण केले आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील महायुती सरकारच्या सर्व योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या कार्याची दखल वरिष्ठांनी देखील घेतली आहे. त्यांनी जिल्ह्यात भाजपचे मजबूत संघटन केले असून बूथ यंत्रणा सक्षम करण्यावर त्यांनी भर दिला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य तथा शेकापचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय बाबासाहेब करांडे यांचे सुपुत्र सुमित बाबासाहेब करांडे यांनी धनाजी पोपट करांडे, यशवंत संदिपान करांडे, विशाल शहाजी करांडे, अमर जालिंदर करांडे, बंडू पोपट करांडे, बाळू हिप्परकर, अशोक टोणे, सदाशिव सावंत, राजेंद्र हजारे, गणेश लवटे, सुधाकर लवटे, श्रीरंग लवटे, चैतन्य जावीर, महेंद्र सावंत, अण्णा मोरे, समाधान लवटे, सुजित चव्हाण, समाधान हारेल, नाना हारेल, विजय जाधव, शरद करांडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष दुर्योधन हिप्परकर, सोमनाथ नरळे, राहुल नरळे, अमोल सरडे, ऋषिकेश सरडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.