political

नांदगाव – मतदान यंत्र बंद; दोन तास मतदान नाही 

नांदगाव, 20 नोव्हेंबर, (हिं.स.)। नांदगाव मतदारसंघातील न्यु इंग्लिश स्कुल मतदान केंद्रावर इव्हीएम मशीन बंद पडल्याचा प्रकार घडल्यानंतर मालेगाव बाह्य मतदार संघातील या.ना.जाधव विद्यालय व निळगव्हाण प्राथमिक शाळा अशा दोन केंद्रांमधील मतदान यंत्रे देखील नादुरुस्त झाल्याने मतदानासाठी आलेल्या मतदारांना काही काळ ताटकळत राहावे लागले.

या.ना.जाधव विद्यालयात सकाळी ‘मॉक टेस्ट’झाल्यावर प्रत्यक्ष मतदान सुरू करीत असताना मतदान यंत्र सुरू होईना. नंतर विद्युत जोडणीत दोष असल्याचे लक्षात आले. हा दोष दूर झाल्यावर यंत्र सुरू झाले. त्यामुळे जवळपास १५ मिनिटे मतदारांना ताटकळत राहावे लागले. त्यामुळे मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. शहराजवळच असलेल्या निळगव्हाण येथे सकाळपासूनच मतदानासाठी लोकांच्या रांगा लागल्या होत्या. तेथील एका केंद्रावर ६५ मतदारांनी आपला हक्क बजावल्यानंतर अचानक मतदान यंत्र बंद पडले. ही बाब केंद्राध्यक्षांनी वरिष्ठांना कळविल्यावर तेथे तातडीने पर्यायी यंत्र उपलब्ध करून देण्यात आले. हे किरकोळ दोष होते असे निवडणूक निर्णय अधिकारी पल्लवी निर्मळ यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button