सांगोला तालुक्यात ७८. १४ टक्के मतदान
सांगोला : सांगोला विधानसभा मतदारसंघासाठी पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आमदार शहाजी पाटील, महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार दीपक साळुंखे पाटील, शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्यात अटीतटीची चुरशीची तिरंगी लढत झाली. या निवडणुकीसाठी मतदारसंघातून ३ लाख ३३ हजार ४९३ मतदार होते. यापैकी २ लाख ६० हजार ५८९ मतदारांनी मतदान केले. सांगोला तालुक्यात रात्री साडेदहापर्यंत सरासरी ७८.१४ टक्के मतदान झाले.
सांगोला मतदार संघासाठी १ लाख ७२ हजार ७०४ पुरुष, १ लाख ६० हजार ७८४ महिला असे एकूण तीन लाख ३३ हजार ४९३ मतदार आहेत यापैकी रात्री साडेदहा वाजेपर्यंत १ लाख ३६ हजार २३६ पुरुष व १ लाख २४ हजार ३५२ महिला इतर एक असे 2 लाख ६० हजार ५८९ मतदारांनी मतदान केले. तालुक्यात सरासरी ७८.१४ टक्के मतदान झाले.
राजुरी, लक्ष्मीनगर, तरंगेवाडी, जवळा, आगलावेवाडी, सांगोला, बागलवाडी, एखतपूर, सोनलवाडी, भाळवणी, आणि महिम या केंद्रातील कामकाज उशीर पर्यंत सुरू होते आणि जवळा येथील मतदान रात्री 9.30 पर्यंत व राजुरी येथील मतदान रात्री 10.30 पर्यंत सुरू होते.