health
प्रोटीनसाठी खा मका! जबरदस्त फायदे
संशोधकांचा दावा आहे की मका मांसाहार आणि सप्लिमेंट फूडमधील प्रोटीनची भरपाई करतो. या मक्यातून प्रोटीनसोबत कार्बोहायड्रेड, फायबर आणि व्हिटॅमिन्स देखील मिळतात. मक्याचे हे वाण बायोफोर्टीफायड आहे.
संशोधकांनी आता आधीच्या मक्याच्या तुलनेत २५० टक्के जास्त प्रोटीन असलेल्या मक्याचे वाण शोधले आहे. वाराणसीतील काशी विद्यापीठाच्या संशोधकांनी याला ”मालवीय स्वर्ण मक्का वन” नाव दिले आहे.
देशात शाकाहारी लोकांची संख्या मोठी आहे. शाकाहारामुळे अनेकांच्या भोजनात प्रोटीनचे प्रमाण कमी आढळते. त्याच्यासाठीही हा मका सकस पर्यय ठरणार आहे. यामुळे शरीरातील रक्ताचे प्रमाण आणि कॅल्शियम वाढवण्यास मदत होणार आहे. त्यासाठी औषध घेण्याची गरज पडणार नाही. डायबेटीस सारख्या समस्या टाळण्यासाठी मक्याचा हा नवा वाण रामबाण ठरणार आहे.