maharashtra

बारामतीत मोठ्या नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवार यांच्या वडिलांच्या शरयू मोटर्समध्ये रात्रीच धडकले पोलीस, झालं तरी काय?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान प्रक्रिया होणार आहे. मतदानाच्या एक दिवस अगोदरच राज्यात मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. नागपूरमध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला झाला आहे. नांदेडमध्ये वंचित उमेदवारावर असाच प्रकार झाला आहे. इतर ठिकाणी काही घटना घडल्या आहेत. तर बारामतीत सुद्धा नाट्यमय घडामोडी घडल्या आहेत. बारामतीकडे संपूर्ण राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष लागलेले असताना पोलिसांनी काल रात्री सर्च मोहीम राबवली.

शरयू मोटर्समध्ये सर्च ऑपरेशन

राष्ट्रवादीत उभी फूट पडल्यापासून बारामती अनेक घटना आणि घाडमोडींचा केंद्रबिंदु ठरली आहे. या ठिकाणी लोकसभेप्रमाणेच विधानसभेला पवार विरुद्ध पवार असा सामना रंगला आहे. श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव युगेंद्र पवार यांचा सामना त्यांचे काका अजित पवार यांच्याशी होत आहे. नवख्या उमेदवाराला उमेदवारी दिल्यावरून अजित पवार यांनी भाषणातून निशाणा साधला आहे. तर शरद पवार यांनी सुद्धा त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

दरम्यान काल रात्री श्रीनिवास पवार यंच्या शरयू मोटर्समध्ये पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले. रात्री पोलिसांनी या ठिकाणी चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे सर्च ऑपरेशन राबवण्यात आल्याचे समजते. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हे सर्च ऑपरेशन का राबवण्यात आले. त्याचा काय उद्देश होता. त्यातून पोलिसांच्या हाती काय लागले, याची माहिती पोलिसांनी दिलेली नाही. पण काल रात्री पोलिसांनी शरयू मोटर्समध्ये सर्च ऑपेरशन राबवले आहे. त्याला निवडणुकीची किनार असल्याची माहिती समोर येत आहे.

श्रीनिवास पवार यांची पहिली प्रतिक्रिया

दरम्यान रात्री पोलिसांनी केलेल्या सर्च ऑपरेशनबाबत उमेदवार युगेंद्र पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शरयू मोटर्स मध्ये चौकशी केली असता काही सापडलं नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. रात्री पोलिसांनी हे सर्च ऑपरेशन राबवले होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती सर्च ऑपरेशन राबवण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान श्रीनिवास पवार याविषयीची माहिती माध्यमांना देणार असल्याचे समोर येते आहे. मतदानाच्या एक दिवसापूर्वीच या घाडमोडी घडल्याने बारामतीत चर्चा सुरू आहे.

Related Articles

Back to top button