sports

सिडनीत भारत आज कोणाच्या बाजूने? पाकिस्तान की न्यूझीलंड?

टी-20 विश्वचषक २०२२ मधील पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंड आमनेसामने येणार आहेत. सिडनी येथे होणाऱ्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. या सामन्यावर भारतीय चाहत्यांचीही पूर्ण नजर असणार आहे. 

कारण टीम इंडियाने सेमी फायनलमध्ये इंग्लंडला धुळ चारली तर फायनलमध्ये पाकिस्तान-न्युझीलंडमधील एकाविरुद्ध लढावे लागणार आहे. भारत-इंग्लंड सेमी फायनलचा सामना गुरुवारी होणार आहे.
आयसीसी स्पर्धांमध्ये भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा रेकॉर्ड चांगला नाही. आयसीसी इव्हेंट्समध्ये न्युझीलंडविरुद्ध प्रत्येक वेळी टीम इंडियाचा पराभव झाला आहे. जर ICC इव्हेंट्समधील भारत-न्युझीलंड यांच्यातील गेल्या काही सामन्यांबद्दल बोलायचे झाले तर न्यूझीलंडने २०१९ च्या वनडे वर्ल्ड कप सेमीफायनल आणि २०२१ मध्ये झालेल्या टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव केला आहे.
आयसीसी इव्हेंट्समध्ये भारताचा पाकिस्तान विरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे. विश्वचषकात भारताने पाकिस्तानला अनेकदा पराभूत केले आहे. मात्र, गेल्यावर्षी म्हणजे २०२१ च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानने पहिल्यांदा भारताचा पराभव केला होता. अशा परिस्थितीत फायनलमध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी व्हावा, अशी चाहत्यांची इच्छा असेल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button