sports
सूर्या माझ्यासारखा खेळतो, पण…
टी २० वर्ल्ड कपमध्ये भारताचा फलंदाज सुर्यकुमार यादव याच्या कामगिरीची चर्चा आहे. त्याला ३६० डिग्री फलंदाज असल्याचं म्हणत काहींनी दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू ए.बी. डिविलियर्ससोबत त्याची तुलना केली. यावर आपली ही तुलना योग्य नसल्याचं सूर्यकुमारने म्हटलं होतं. मात्र डिविलियर्सने सूर्यकुमारचं कौतुक केलं आहे.
क्रिकेटच्या मैदानात सर्व बाजूला फटकेबाजी करण्याच्या क्षमतेमुळे डिविलियर्सला मिस्टर ३६० डिग्री या नावाने ओळखलं जातं. डिविलियर्स म्हणाला की, सुरुवातीला संयमाने खेळत तो नंतर गोलंदाजांवर दबाव टाकतो. त्याचं भविष्य जबरदस्त आहे. तो माझ्यासारखं खेळतो. त्याला त्याच्या कामगिरीत सातत्य ठेवण्यावर लक्ष द्यावं लागेल. पुढच्या पाच ते दहा वर्षात त्याला असाच खेळ दाखवावा लागेल.
टी २० वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये ४ सर्वोत्तम संघ पोहोचले आहेत पण या ४ संघांच्या निवडीसाठी आणखी सामने खेळवले गेले पाहिजे होते असंही एबी डिविलियर्सने म्हटलं. भारत, इंग्लंड, न्यूझीलंड, पाकिस्तान असे चार संघ सेमीफायनलमध्ये पोहोचले आहेत.