sports

Ind vs Nz 3rd Test : 5,11,1,1,1… नाम बड़े और दर्शन छोटे… मुंबईत टीम इंडियाने लावली विकेटची ‘माळ’! वानखेडेवर टॉप ऑर्डरचा पर्दाफाश

India vs New Zealand 3rd Test : नाम बड़े और दर्शन छोटे…. मुंबई कसोटीतील दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजी पाहिली तर तुम्ही पण हेच म्हणाला. 147 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाने 29 धावांत पाच विकेट गमावल्या. रोहित शर्मा (11), शुभमन गिल (1), विराट कोहली (1), यशस्वी जैस्वाल (5) आणि सर्फराज खान (1) पॅव्हेलियनमध्ये परतले आहेत. त्यामुळे भारतीय संघावर क्लीन स्वीपचा धोका निर्माण झाला आहे. भारतीय फलंदाजांनी आपल्याच घरात फिरकी विकेट्सवर कमकुवत असल्याचे सिद्ध केले आहे. आठ षटकांनंतर भारताची धावसंख्या पाच गड्यांच्या मोबदल्यात 31 धावा आहे. टीम इंडियाला अजूनही 116 धावांची गरज आहे.

HTML img Tag Simply Easy Learning    

टीम इंडियाने मुंबई कसोटी सामन्यावर आपली पकड कायम ठेवली होती, हा कसोटी सामना जिंकण्यासाठी भारतीय संघाला 147 धावांचे लक्ष्य मिळाले, मात्र पुन्हा एकदा रोहितची सेना फलंदाजीमध्ये सुपर फ्लॉप ठरत आहे. या मालिकेत न्यूझीलंड संघाने आधीच 2-0 अशी अभेद्य आघाडी घेतली आहे, अशा स्थितीत टीम इंडियाने 12 वर्षांनंतर भारतात कसोटी मालिका गमावली आहे. दुसरीकडे, प्रत्येक पराभवाने टीम इंडियाचे WTC फायनलमध्ये जाण्याचे स्वप्न भंग पावत आहे.

 

Related Articles

Back to top button