सुर्या- डिव्हिलियर्स सारखे फॅन्सी शॉट्स का खेळत नाही?
T20 विश्वचषकात सर्वाधिक धावा कोणाच्या नावावर आहेत? विश्वचषकाच्या इतिहासात कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक धावा केल्या आहेत? किंवा आंतरराष्ट्रीय T20 सामन्यांमध्ये कोणत्या फलंदाजाने सर्वाधिक धावा केल्या आहेत? या सर्व प्रश्नांचे उत्तर एकच आहे, ते म्हणजे विराट कोहली.
कोहली हा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधला सर्वात यशस्वी फलंदाज आहे पण तुम्हाला तो सूर्यकुमार यादव, एबी डिव्हिलियर्स किंवा इतर कोणत्याही धडाकेबाज फलंदाजांसारखे फॅन्सी शॉट्स खेळताना दिसणार नाही.
यामागे एक महत्त्वाचे कारण आहे आणि ते कारण काय आहे, हे ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू इयान चॅपल यांनी सांगितले आहे.
चॅपल यांनी सांगितले की, आम्ही काही वर्षांपूर्वी विराटची मुलाखत घेतली होती. त्यामध्ये आम्ही विराटला विचारले की, तो टी-२० मध्ये इतर फलंदाज खेळतात तसे फॅन्सी शॉट्स का खेळत नाही? तेव्हा तो म्हणाला, त्या शॉट्सचा माझ्या कसोटी खेळावर परिणाम होईल. तो होऊ नये, असे मला वाटते. त्यामुळे मी तसे शॉट्स खेळत नाही.