crime

पैसे गुंतवा म्हणत 5 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक

सांगोला(प्रतिनिधी):- शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा म्हणत 5 इसमांनी 5 लाख 80 हजार रुपयांची फसवणूक केली असल्याची घटना सांगोला बस स्थानकावरील पार्कीगमध्ये व सुर्या इंटरनॅशनल 34 प्रमाणे या ठिकाणी घडली. अजयकुमार आर्या, सौरभ चावला, बलजित सिंग, करणजित सिंग, राजेंद्र कुमार आदी 5 जणांवर फसवणुकीचा सांगोला पोटीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फसवणुकीची फिर्याद सचिन शांताराम वाघमारे (रा. संगेवाडी ता. सांगोला) यांनी दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दि. 22 जानेवारी 2023 रोजी दुपारी 02:00 वा सोलापुर येथे कॅपमोअर एफएक्स या कंपनीचे अजयकुमार आर्या, सौरभ चावला, बलजित सिंग, करणजित सिंग आणि राजेंद्र कुमार यानी मिटींग घेतली होती. या मिटींगमध्ये शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा आम्ही 8 ते 10 टक्के महिना परतावा मिळवुन देवु असे आमीष दाखवुन भुरळ पाडली. वरील 5 इसमांनी रक्कम त्यांच्या आयसीआयसीआय बॅकेच्या गणेश ट्रेडींग कंपनीच्या नावे असलेल्या खाते क्र. क्र. 670205601361 यावर पैसे भरण्यास सांगीतलेने दि. 12 जुलै रोजी 11:35 वाजता 2 लाख 80 हजार रुपये रु रोखीने सोलापुरमध्ये आणि दि. 13 जुलै 2023 रोजी दुपारी 01:30 ते 02:00 वाचे सुमारास सांगोला बस स्थानकावरील पार्कीगमध्ये रोख 3 लाख रु मला देण्यास भाग पाडले. आधार कार्ड, पॅन कार्ड, बॅक पासबुक अशी कागदपत्रे घेवुन डी मॅट अकौंट उघडले नाही, कसलाही परतावा दिला नाही, नंतर सर्वांनी त्यांचे मोबाईल बंद केले, बेवसाईट बंद केली.

 

डिसेंबर 2023 आणि जानेवारी 2024 मध्ये झुम मिटींग घेवुन पैसे परत देण्याचे पुन्हा आमीष दाखविले. त्यानंतर आजपावेतो कसलाही परतावा दिला नाही, म्हणून कॅपमोअर एफएक्स कंपनीचे अजयकुमार आर्या, सौरभ चावला, बलजित सिंग, करणजित सिंग आणि राजेंद्र कुमार यानी सर्वांनी 5 लाख 80 हजार रुपयांची फसवणुक केली असल्याची फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकॉ मोहोळकर करीत आहेत

Related Articles

Back to top button