crimemaharashtratop news

दिवाळीला निघाले पण रस्त्यातच होत्याचं नव्हतं झालं, कार ट्रकला धडकल्याने तिघांचा दुर्दैवी अंत!

बुलढाणा : नियमांचे उल्लंघन केल्यामुळे झालेल्या अपघातात दरवर्षी हजारो लोकांचा मृत्यू होतो. वाहन चालवताना अगदी छोट्या-छोट्या चुकांमुळेही अनेकजण जीवाला मुकतात. बुलढाणा जिल्ह्यातही अपघाताची अशीच एक भीषण घटना घडली आहे. या अपघातात तीन जण ठार झाले असून दोन जण जखमी आहेत.

नेमका अपघात कसा झाला?

मिळालेल्या माहितीनुसार हा अपघात समृद्धी महामर्गावर घडला आहे. सिंदखेड राजा जवळ असेलेल्या पिंपळखुटा गावाच्या परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. भरधावकार धावत्या ट्रकला पाठीमागून धडकल्याने ही दुर्घटना झाली.

मृतांमध्ये एक दाम्पत्य आणि एका मुलाचा समावेश

या अपघातात एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे. दोन जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार मृतक हे दिवाळीसाठी पुण्याहून अमरावतीकडे जात होते. मृतांमध्ये एक दाम्पत्य आणि एका मुलाचा समावेश आहे. सर्वांना आनंद देणारा हा दिवळी सण मात्र या कुटुंबासाठी दुख:चा सागर घेऊन आला आहे. या अपघातामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. 

अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तींची नावे

रीहश दाभाडे 
राजेश दाभाडे.
शुभांगी दाभाडे

जखमी

समीक्षा दाभाडे
आश्विन गणोरकर

महामागार्गावर बर्निंग कारचा थरार

मुंबई गोवा महामार्गावरही अपघाताची अशीच एख घटना घडली. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोस्ते घाटामध्ये बर्निंग कारचा थरार पाहायला मिळाला. मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या कारला अचानक आग लागली. आग लागल्याचे समजताच प्रसंगावधान दाखवत आतील प्रवासी सुखरूप बाहेर पडले. काही क्षणातच संपूर्ण कारने पेट घेतला. ही कार तब्बल दोन तास पेटत होती. या दुर्घटनेनंतर महामार्गावरील एक लेन तात्पुरती बंद करण्यात आली होती.   

Related Articles

Back to top button