solapur
अखेर मास्तरांचे शब्द ठरले खरे : वादग्रस्त आयुक्त पी.शिवशंकर यांची बदली
शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सांयकाळी 5 वाजता सोलापूर महानगरपालिका यांच्या कार्यालयावर लाल बावटा दिव्यांग श्रमिक संघटना कडून दिव्यांगाना दिवाळी भेट म्हणून 5000 /- सानुग्रह अनुदान देण्यात यावे या मागणी करीता सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व दिव्यांगाच्या शिष्टमंडळास भेटीची वेळ दिली मात्र ते त्या नियोजित वेळेत आले नाहीत.
कोणतेही निरोप न देता दिव्यांगासह माजी आमदार कॉ. नरसय्या आडम मास्तर यांना तब्बल अडीच तास आयुक्त कार्यालयाच्या आवारात प्रतीक्षेत बसवले. दिव्यांग बद्धल एक प्रशासकीय अधिकारी जनतेचे सेवक असणाऱ्या आयुक्त पी. शिवशंकर यांची अनास्था, अवहेलना खपवून घेतले जाणार नाही म्हणून तात्काळ या घटनेचा निषेध करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आयुक्तांच्या या मग्रूर वर्तनाची चौकशी करण्याची इमेल द्वारा मागणी केली होती. तसेच दिव्यांग व्यक्तींच्या अन्य न्याय हक्काच्या मागण्या बाबत ही सविस्तर निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री संबंधित विभागाचे अधिकारी आदींना इमेल द्वारा पाठवण्यात आले होते.
त्यावेळी ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर यांनी दिव्यांग बांधवासमोर पण केले होते की, दिव्यांगाची अवहेलना करणाऱ्या या आयुक्तांचे तोंड बघणार नाही.
आज सांयकाळी आयुक्त पी.शिवशंकर यांची बदली होताच अखेर मास्तरांचे हे शब्द खरे ठरले अशी दिव्यांगात चर्चेला उधाण आले आहे.