शिवसेनेच्या खा.संजय राऊतांची तोफ धडाडणार…!
शहाजीबापूंसह महाविकास आघाडीचे बंडखोर असणार खा. संजय राऊत यांच्या रडारावर
सांगोला ;
महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ सोमवार १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता महूद ता.सांगोला येथील ग्रामपंचायतीच्या शेजारी नवीन बाजार पटांगणावर शिवसेनेचा बुलंद आवाज फायरब्रँड नेते खासदार संजय राऊत यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रचार सभेत खासदार संजय राऊत हे गद्दार आमदारासह बंडखोरावर कोणता निशाणा साधणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. या सभेसाठी सांगोला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक यांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा.पी.सी.झपके, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष डॉ. धनंजय पवार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, शिवसेनेचे तालुका प्रमुख अरविंद पाटील यांनी केले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासाठी प्रचार सभा घेणार आहे. सोमवार १८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता महूद ता.सांगोला येथील ग्रामपंचायतीच्या शेजारी नवीन बाजार पटांगणावर शिवसेनेचा बुलंद आवाज खासदार संजय राऊत यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुख्यमंत्री शिंदे पक्षाच्या उमेदवारांच्या उमेदवारांना लक्ष्य केले आहे. त्यामुळे विधानसभा प्रचारात शिवसेना नेते अधिक आक्रमक झाले आहेत. सांगोल्यात महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिपकआबा साळुंखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारासाठी सांगोल्यात येणार आहेत. या प्रचार सभेत संजय राऊत हे शहाजीबापूंसह बंडखोरावर कोणता निशाणा साधणार याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
######
🎁*Best Buy Wedding Offer*💍
टायटन,सोनाटा,फास्टट्रॅक घड्याळांवर 40% पर्यंत सूट*
👉ऑफर Selected वॉचेसवर उपलब्ध
📌ऑफर 15 ते 30 नोव्हेंबर पर्यंत
✅बजाज फायनान्स EMI
✅स्मार्टवॉचवर 70 % पर्यंत सूट*
*टायटन वर्ल्ड | टायटन आय+*
फोटो विश्व कलर लॅब जवळ,
भोपळे रोड ,सांगोला
संपर्क – #7507 995 995