sports
मोठी बातमी! रोहित-विराट-द्रविडची होणार चौकशी
गुरुवारी झालेल्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप सामन्यात इंग्लंडकडून भारताला मोठा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे भारतावर टीका केली जात आहे. अनेक दिग्गज खेळाडूंनी या पराभवासाठी विविध खेळाडूंना जबाबदार पकडले आहे.
भारतावर चोहोबाजूंनी टीका केली जात आहे. दरम्यान या लाजिरवाण्या पराभवाबाबत आता बीसीसीआय कडक पाऊल उचलणार आहे. कारण बीसीसीआय आता भारताच्या या पराभवाची चौकशी करणार आहे. या वर्ल्डकपमध्ये विराट कोहली आणि सूर्यकुमार यादव वगळता इतर खेळाडूंनी निराशा केली.
कर्णधार रोहित शर्मा सुद्धा फेल गेला. याची चौकशी करण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. भारताचा सलामीवीर केएल राहुल याची बॅट सुद्धा थंडावली होती. यामुळेच आता लवकरच शर्मा, विराट कोहली, संघाचे कोच राहुल drawid यांच्याशी चर्चा करून पुढील रणनीती आखण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारताच्या या कामगिरीबद्दल बीसीसीआयचे सचिव जय शहा हे सुद्धा नाराज आहेत.