sports
टी-20 वर्ल्ड कप | ‘हा’ संघ अद्यापही अपराजित
ऑस्ट्रेलियामध्ये सुरू असलेल्या टी-20 विश्वचषकातील सामने अटीतटीचे होत आहेत. वर्ल्ड कपच्या जेतेपदावर आपल्या संघाचे नाव कोरण्यासाठी सर्व संघ जोरदार सरावासह मैदानात उतरत आहेत.
या विश्वचषकात आतापर्यंत सर्वच संघांनी उत्तम कामगिरी करत सामन्यात अटीतटीची लढत दिली आहे. या टी-20 विश्वचषकात सर्वच संघांना धक्के बसले आहेत. मात्र एक संघ असा आहे की, जो अद्याप एकही सामना पराभूत झालेला नाही. हा संघ म्हणजे दक्षिण आफ्रिका.
टी-20 विश्वचषकाच्या ब गटात भारताचा एक पराभव झाला आहे. पाकिस्तानचे दोन पराभव झाले आहेत. बांगलादेश आणि झिम्बाब्वे यांचेही पराभव झाले आहेत. पण या गटातील आफ्रिकेच्या संघाला अजून एकही पराभव पत्करावा लागलेला नाही.

आफ्रिकेचा पहिला सामना हा झिम्बाब्वेविरुद्ध झाला होता. या सामन्यात पाऊस पडला. त्यामुळे हा सामना रद्द करावा लागला. आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.
त्यानंतर आफ्रिकेचा दुसरा सामना बांगलादेशविरुद्ध झाला होता. यात आफ्रिकेने बांगलादेशवर दणदणीत विजय मिळवला. त्यानंतर आफ्रिकेचा तिसरा सामना भारताशी झाला. या सामन्यात आफ्रिकेने भारतावर विजय मिळवला. या विश्वचषकात आफ्रिकेचा अजूनपर्यंत एकही पराभव झालेला नाही.