sports
टी-20 वर्ल्डकपमध्ये ठोकले सर्वात जलद अर्धशतक
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस तुफानी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने हा विजय मिळवला आहे. स्टॉयनिसने केवळ 17 चेंडूत अर्धशतक ठोकले.
या खेळीमुळे स्टॉयनिसच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद झाली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह याच्यानंतर टी-20 विश्वचषकात सर्वात जलद अर्धशतक ठोकणारा स्टॉयनिस पहिला खेळाडू ठरला आहे. 2007 साली झालेल्या टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्ध युवराज सिंहने 12 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. त्यानंतर काल झालेल्या सामन्यात स्टॉयनिसने जलद अर्धशतक केले.
दरम्यान, सर्वात वेगवान अर्धशतकाच्या यादीत युवराज सिंह अजूनही टॉपवर आहे.
ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून श्रीलंकेच्या संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर श्रीलंकेच्या संघाने निर्धारित 20 षटकात 157 धावांवर रोखले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाच्या संघाने 7 विकेट्स राखून हे लक्ष्य पूर्ण केले.