ठाकरे आणि शिंदे यांच्यातील कायदेशीर संघर्षानंतर निवडणूक आयोगाने शिवसेनेचे नाव आणि चिन्ह गोठवलं. त्यानंतर दोन्ही गटांना स्वतंत्र नाव आणि चिन्ह आयोगाकडून देण्यात आलं आहे.
याशिवाय शिवसेनेवर दावा करताना ठाकरे आणि शिंदे गटानं सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांचीही पडताळणी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून केली जात आहे. त्यात ठाकरे गटाने सादर केलेली तब्बल २.५ लाख प्रतिज्ञापत्र आयोगाने बाद ठरवली आहे. त्यामुळे ठाकरेंना मोठा धक्का बसला आहे.
ठाकरे गटाने शिवसेनेवर दावा करताना एकूण ११ लाख प्रतित्रापत्र निवडणूक आयोगाकडे सादर केली होती.
या प्रतिज्ञापत्रांची निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून तपासणी सुरू असताना अडीच लाख प्रतिज्ञापत्रांचा फॉरमॅट चुकीचा असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आयोगाने ही प्रमाणपत्र बाद ठरवण्याचा निर्णय घेतला आहे.





WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.54 PM
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.55 PM
WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.59 PM
WhatsApp Image 2026-04-12 at 12.03.05 PM










