sports
टी-२० वर्ल्डकप ; क्रिकेटमध्ये भूकंप..! राजीनामा सत्राला सुरूवात
T20 विश्वचषकमध्ये वेस्ट इंडिज संघाने निराशाजनक कामगिरी केली. संघाला पहिल्याच फेरीत झटके बसले. त्यामुळे सुपर 12 मध्ये प्रवेश करता आला नाही. यानंतर पराभवाचे विश्लेषण सुरू करण्यात आले असून अनेक कठोर निर्णय घेण्याचे विचारात आहे.
अशा परिस्थितीत आता या वर्षाच्या अखेरीस संघाचे मुख्य प्रशिक्षक फिल सिमन्स आपल्या पदावरून पायउतार होणार आहेत. 2015 पासून सिमन्स वेस्ट इंडिजच्या प्रशिक्षक संघाचे प्रभारी होते आणि 2016 मध्ये त्यांच्या प्रशिक्षणाखाली संघाने दुसरा T20 विश्वचषक जिंकला होता.
ऑस्ट्रेलियात सुरू असलेला T20 विश्वचषक वेस्ट इंडिजसाठी निराशाजनक होता. संघाने तीन सामन्यांपैकी फक्त एक सामना जिंकला आणि पहिल्या फेरीत स्पर्धेबाहेर फेकला गेला. डिसेंबरच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियात वेस्ट इंडिजच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेनंतर वर्षाच्या अखेरीस आपल्या प्रशिक्षकपदावरुन सिमन्स राजीनामा देतील.

इथे ही वाचा