फॅबटेक पॉलिटेक्निक कॉलेज मध्ये ५ दिवसीय डेटा स्ट्रक्चर विषयावरील कार्यशाळा संपन्न
सांगोला: विद्यार्थ्यांच्या शैक्षणीक प्रगतीसाठी फॅबटेक पोलिटक्निक कॉलेज मध्ये विविध उपक्रम सतत पार पडत असतात.मागिल वर्षीपासून नव्याने सुरू केलेल्या कंप्यूटर इंजिनियरिंग विभागाने द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ५ दिवसीय डेटा स्ट्रक्चर युजिंग सी या विषयावर कार्यशाळा आयोजित केली होती.
डेटा स्ट्रक्चर्स हे संगणक प्रोग्रामिंगचे मूलभूत बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. ते प्रोग्राममध्ये डेटा कसा व्यवस्थित, संग्रहित करतात आणि तो हाताळला जाऊन कसा परिभाषित करतात ते या कार्यशाळेमधून विद्यार्थ्याना शिकायला मिळाल्याचे कंप्यूटर विभागाचे प्रमुख प्रा. कोमल कांबळे यांनी सांगीतले. या कार्यशाळेसाठी माधुरी पुजारी यांचे मार्गदर्शन लाभले. या कार्यशाळेमध्ये एकूण ७३ विद्यार्थ्यानी सहभाग नोंदवला असून प्रा. चैताली जाधव व प्रा.सविता वाघमोडे यांनी मोलाचे सहकार्य केले.
ही कार्यशाळा संस्थेचे चेअरमन मा.श्री भाऊसाहेब रूपनर, मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक श्री. दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर डॉ.संजय आदाटे पॉलिटेक्निक चे प्राचार्य प्रा.तानाजी बुरुंगले यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली.