Friday, October 18, 2024
Homesolapurविधानसभेत कमळ फुलवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावे - चेतनसिंह केदार सावंत 

विधानसभेत कमळ फुलवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावे – चेतनसिंह केदार सावंत 

भाजपा पदाधिकाऱ्यांनी बुथ सशक्तीकरण अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा
सांगोला /प्रतिनिधी:- भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करून, विधानसभेत कमळ फुलवण्यासाठी भाजप कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. विधानसभा निवडणुकांसाठी पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून सक्षम बूथ कार्यक्रमाची तातडीने अंमलबजावणी करावी. तसेच बुथ सशक्तीकरण अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा अशा सूचना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.
       राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आमदार राजेंद्र राऊत, आमदार राम सातपुते, माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी मंडल अध्यक्षांच्या निवडी करण्यात आल्या आहेत. आगामी काळात होणार्‍या विधानसभा निवडणूकीत भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी बुथमधील मतदारांची सामाजिक रचना लक्षात घेऊन त्या आधारावर बुथ समित्या गठीत करणे, मतदान केंद्रानुसार बैठकीचे नियोजन करणे, केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचे लाभार्थ्यांना धन्यवाद पत्र देऊन लाभार्थ्याची यादी तयार करणे, प्रत्येक बुथमधील र्स्माट फोन वापरणार्‍यांची यादी बनवणे, निवडणुक चिन्ह कमळ ठळकपणे दिसेल असे पक्ष मजबूत करण्याचे कार्य प्रत्यक्ष कृतीतून करावे असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी केले आहे.
     विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकवण्यासाठी भाजपचे प्रत्येक मंडल अध्यक्ष, विविध सेलचे अध्यक्ष यांनी मिळून मंडलाची बैठक आयोजित करावी. प्रत्येक बुथ, शक्ती केंद्र, मंडल आणि जिल्हास्तरीय व्हॉट्सअप ग्रुप तयार करावा अशा सूचना भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी मंडल अध्यक्ष व विविध सेलचे अध्यक्ष यांना दिल्या आहेत.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तसेच भारतीय जनता पार्टीचा अंत्योदय कल्याणाचा विचार घेऊन जाण्यासाठी संघटनात्मक पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आले आहेत. माढा पश्चिम मंडल अध्यक्षपदी योगेश कृष्णात बोबडे, माढा पूर्व मंडल अध्यक्षपदी योगेश सुरेश पाटील, माळशिरस पश्चिम मंडल अध्यक्षपदी शरद महादेव मदने, करमाळा ग्रामीण मंडल अध्यक्षपदी सचिन अरुण मिसाळ तर कुर्डवाडी मंडल अध्यक्षपदी अविनाश श्रीपती गोरे यांच्या निवडी करण्यात आल्या असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली. यावेळी योगेश बोबडे, दत्ता जाधव, अमोल कुलकर्णी, अविनाश फडतरे, राहुल केदार, नंदकुमार मोरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments