business
बजाजने लॉन्च केली खूपच स्वस्त बाईक, फीचर-मायलेज सर्वच मस्त
बजाज ऑटोने प्लॅटिना ११० एबीएस भारतीय बाजारात लॉन्च केले. २०२३ बजाज प्लॅटिना ११० एबीएस भारतात ७२,२२४ रुपये (एक्स-शोरूम दिल्ली) च्या सुरुवातीच्या किंमतीत लॉन्च करण्यात आली आहे. नवीन प्लॅटिना -११० एबीएस११५.४५ सीसी सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड, इंधन-इंजेक्टेड इंजिन देण्यात आले आहेत. जे ७ हजार आरपीएमवर ८.४ बीएचपी पॉवर आणि ५००० आरपीएमवर ९.८१ एनएम पीक टॉर्क निर्माण करते.
याचे इंजिन ५-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. बाईकचा टॉप स्पीड ९० किमी प्रती तास आहे. प्लॅटिना ११० एबीएसला टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागील बाजूस ड्युअल स्प्रिंग-लोडेड शॉक शोषक मिळतात.
ब्रेक्ससाठी बाईकमध्ये सिंगल-चॅनल अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टम आहे ज्यामध्ये समोर २४० मिमी डिस्क आणि मागील बाजूस ११० मिमी ड्रम आहे. बाईक १७ -इंच ट्यूबलेस अलॉय व्हीलवर चालते आणि ११ -लिटर इंधन टाकी आहे. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर यात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे, यात बाईकबद्दल बरीच माहिती मिळते.