businesseducationindia worldtop news

बापरे बाप! 3 रुपयांचा शेअर एका दिवसात थेट 2,36,250 रुपयांवर; स्टॉक मार्केटमध्ये रचला नवा इतिहास

मुंबई : शेअर बाजारात कधी काय होईल हे सांगता येत नाही. या बाजारात एखादा गुंतवणूकदार एका क्षणात कोट्यधीश होतो तर कधी एखादा गुंतवणूकदार क्षणात उद्ध्वस्त होऊन जातो. सध्या मात्र एका कंपनीने इतिहास रचला आहे. या कंपनीत काही हजार रुपये गुंतवणारे थेट कोट्यधीश झाले आहेत. या स्मॉलकॅप कंपनीचा शेअर एका दिवसात तीन रुपयांवर थेट सव्वा दोन लाखांच्याही पुढे गेला आहे. एका दिवास एवढी मोठी भरारी घेऊन या शेअरने भांडवली बाजारात इतिहास रचला आहे.

एलसिड इन्व्हेस्टमेंटने रचला इतिहास

शेअर बाजारात एका दिवसात नवा इतिहास रचणाऱ्या या कंपनीचे नाव एलसिड इन्व्हेस्टमेंट (Elcid Investments) असे आहे. ही एक स्मॉलकॅप कंपनी आहे. या कंपनीच्या एका शेअरचे मूल्य 3.53 रुपये होते. हे मूल्य एका दिवसात थेट तब्बल 2,36,250 रुपये झाले. म्हणजेच या शेअरने एका दिवसात तब्बल 66,92,535 टक्क्यांनी भरारी घेतली आहे. या कामगिरीनंतर एलसिड इन्व्हेस्टमेंट ही कंपनी भारतीय भांडवली बाजारात सर्वांत महाग शेअर असणारी कंपनी बनली आहे. याआधी एमआरएफ या कंपनीच्या शेअरचे मूल्य ( 1.2 लाख रुपये) सर्वाधिक होते.

काही कंपन्या पुन्हा एकदा सूचिबद्ध करण्याचा निर्णय

भारतीय शेअर बाजारात एवढी मोठी उलथापालथ याआधी कधीही घडली नाही. 2021 साली क्रिप्टोकरन्सी आली होती. तेव्हा क्रिप्टोकरन्सीमध्ये अशाच प्रकारची उलथापालथ झाली होती. काही दिवसांत क्रिप्टोकरन्सीनचे मूल्य थेट गगनाला भिडले होते. सोमवारी (21 ऑक्टोबर) बीएसई आणि एनएसईने काही कंपन्या पुन्हा एकदा सूचिबद्ध करण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये काही मोजक्या इन्व्हेस्टमेंट होल्डिंग कंपन्यांचा समावेश करण्यात आला होता. यात एलसिड एन्व्हेस्टमेंटचाही सहभाग होता. त्याचाच परिणाम म्हणून एलसिड कंपनीच्या शेअरने थेट शिखर गाठले. 

Related Articles

Back to top button