शिक्षणाचा मूलभूत विचार देणारे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर उच्च विद्याविभूषित होते. शिक्षण हे वाघीणीचं दूध आहे, असं ते नेहमी म्हणायचे. शिक्षणासारखा दुसरा सर्वोत्तम गुरू नाही या मतावर बाबासाहेब ठाम होते. एखाद्या समाजाची प्रगती साध्य करायची असेल तर शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही असं ते म्हणायचे. शिक्षण हा जीवनातील प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी कठोर अभ्यास करून समाजाचे निष्ठावान नेते बनले पाहिजे. – डॉ.आंबेडकर.
प्राथमिक शिक्षणाचा सार्वत्रिक प्रचार हा सर्वांगीण राष्ट्रीय प्रगतीचा पाया आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षणाच्या बाबतीत सक्तीचा कायदा करण्यात यावा.- डॉ. आंबेडकर (महाबळेश्वर, ६ मे १९२९)
मुला-मुलींना शिक्षित करा, त्यांना पारंपरिक व्यावसायिक कामात गुंतवू नका. – डॉ. आंबेडकर (मुंबई, १३ जुलै १९४१)
शिका, संघटित व्हा, संघर्ष करा, आत्मविश्वास बाळगा, कधीही हार मानू नका, ही आपल्या जीवनाची पाच तत्त्वे आहेत. – डॉ. आंबेडकर (नागपूर, २९ जुलै, १९४२).
तांत्रिक आणि वैज्ञानिक प्रशिक्षणाशिवाय देशाची कोणतीही विकास योजना पूर्ण होणार नाही. – डॉ. आंबेडकर (कोलकाता, २४ ऑगस्ट १९४४).
आपण राजकीय आंदोलनाला जेवढे महत्त्व देतो तेवढेच महत्त्व आपण शिक्षणाच्या प्रसाराला दिले पाहिजे. – डॉ. आंबेडकर (मनमाड, ९ डिसेंबर, १९४५).