Sunday, September 8, 2024
Homesolapurतुळजापुरला जाणा-या भाविकांसाठी नवीन रेल्वे ट्रॅक

तुळजापुरला जाणा-या भाविकांसाठी नवीन रेल्वे ट्रॅक

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद हा नवीन रेल्वे मार्ग उभारण्यात येणार आहे. राज्य सरकारने याच्या उभारणीसाठी स्वत:चा आर्थिक सहभाग म्हणून ४५२ कोटी ४६ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे हा नवा रेल्वेमार्ग लवकर होईल, असे राज्य सरकारने सांगितले. यामागे देशातील सर्व तीर्थक्षेत्रे एकमेकांना दळणवळणाने जोडण्याचे केंद्र व राज्य सरकारचे धोरण आहे. 

हे तीर्थक्षेत्र रेल्वेने जोडण्याची मागणी गेल्या चार दशकांपासून केली जात होती. ती आता लवकरच पुर्ण होणार आहे. या नव्या रेल्वेमार्गाची लांबी ८४.४४ किलोमीटर आहे. या नव्या रेल्वेमार्गादरम्यान एकूण दहा रेल्वे स्थानके उभारली जाणार आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील मिळून ३३ गावांतून हा नवा रेल्वेमार्ग जाणार आहे. त्यासाठीची भूसंपादनाची प्रक्रिया प्रगतिपथावर असताना निधीअभावी अडचणी आहेत. या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी एकूण ९०४ कोटी ९२ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात राज्य सरकारचे ५० टक्के योगदान आहे. 
राज्य सरकारने आपला संपूर्ण आर्थिक सहभाग म्हणून ४५२ कोटी ४६ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सोलापूरकरांसह तुळजापूर आणि उस्मानाबादकरांना दिलासा मिळाला आहे. पश्चिम महाराष्ट्र व मराठवाडय़ासह दक्षिण भारताला जोडणारा म्हणून हा नवा रेल्वेमार्ग महत्त्वाचा ठरणार आहे.
RELATED ARTICLES

Most Popular

Recent Comments