solapur
धर्मराज काडादी यांना वाढता पाठिंबा; विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली
जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सभासद शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे, बोरामणी विमानतळ लवकरात लवकर सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्याकडून होत आहे, या मागणीला आता आमदार प्रणिती ताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने जाहीर पाठींबा देण्यात आला आहे.पाठींब्याचे पत्र आंदोलकांना देण्यात आले.माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ साठी प्रयत्न केले होते. परंतु सरकार बदल्यानंतर काम पूर्ण होऊ शकले नाही, त्यामुळे बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकर सुरू व्हावे अशी युवक काँग्रेसची देखील मागणी असल्याने पाठींब्याचे पत्र दिल्याचे काँग्रेसचे शहर युवक अध्यक्ष गणेश डोंगरे म्हणाले. दरम्यान कालच बाळासाहेब शिवसेनेने याबाबत इशारा दिला होता. उद्योगपतींच्या हट्टापायी सिध्देश्वर कारखान्याची चिमणी पाडुन कारखाना बंद पाडण्याचा कोणी विचार केला असेल तर विमानतळावर एकही विमान उतरु देणार नाही, असा इशारा अक्कलकोट बाळासाहेब शिवसेना विधानसभा संघटक प्रा.सुर्यकांत कडबगावकर यांनी दिला होता.दरम्यान याबाबत या कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांना वाढता पाठींबा मिळत आहे. यामुळे सिद्धेश्वर कारखान्याच्या विरोधकांना धक्का बसत आहे. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरीही मोठया संख्येने या आंदोलनात सहभागी झाले आहेत.