solapur
खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना निवृत्ती दिवशीच पेन्शनचा लाभ देण्यासाठी प्रयत्नशील ; दत्तात्रय सावंत
शिक्षक आपले काम प्रामाणिकपणे करत असतात.अनेक अडचणीवर मात करुन विद्यार्थी घडविण्याचे कार्य अविरत सुरु असते.अशा शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरविणे निश्चितच कौतुकास्पद आहे.पुरस्कार दिल्याने काम करणार्या शिक्षकांना प्रेरणा मिळते, असे मत माजी शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत यांनी व्यक्त केले.
सोलापुरात डाॅ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्यावतीने महात्मा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर शिक्षणाधिकारी संजय जावीर , केंद्रप्रमुख सिद्राम वाघमोडे, प्रदेश सचिव सुनिल चव्हाण,नितीन जाधव, सोमेश्वर याबाजी, मारुती गायकवाड, शाम कदम, सचिन चौधरी, अ.गफुर अरब व संघटनेचे जिल्हाध्यक्ष विनोद आगलावे उपस्थित होते.
महापालिका कार्यक्षेत्रातील शिक्षकांना निवृत्ती दिवशीच पेन्शनचा लाभ देण्यात येतो.
त्याच धर्तीवर खाजगी प्राथमिक शाळेतील शिक्षकांना त्यांचा लाभ मिळवुन देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे मत प्राथमिकचे शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी व्यक्त केले.
महात्मा जोतिराव फुले जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकप्रकाश जाधव ( पंढरपुर),महादेव इटेकर,(पोखरापुर), रिजवान शेख (सोलापुर) ,सुधीर नाईकनवरे (मोहोळ), गौरीशंकर नरुणे (तीर्थ), राहुल जाधव (माळीनगर), सचिन चेंडगे(करमाळा), प्रकाश चौधरी(बार्शी), पांडुरंग भाले (आहेरवाडी), अकिब मुजावर (मंगळवेढा), काशिनाथ माने (सोलापुर), सुवर्णा जगदाळे (पंढरपुर), शैलजा मुळे (सोलापुर), असिफा काझी (इंडीयन माॅडेल स्कुल), सुवर्णलता साबळे (माळशिरस), मनिषा पाटील (सोलापुर), समीना मुजावर(सोलापुर) कर्मवीर भाऊराव पाटील उपक्रमशील शाळा पुरस्काराने सहस्र्तार्जुन प्राथमिक विद्यामंदिर व जिल्हा परिषद कन्नड प्राथमिक शाळा सुलेरजवळगी यांना गौरविण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अनिल गायकवाड, अजित कणसे, सिद्धेश्वर पवार, विशाल पवार, प्रकाश बाळगे, नितीन भांगे, धन्यकुमार स्वामी, दिपक बाळासाहेब पाटील, संतोष रजपुत, महेश केवटे, निलेश पवार, बरगली लांडगे, श्रीराम जाधव यांनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अतुल नारकर यांनी तर दिपक डांगे यांनी आभार मानले.