sports
१९ वे षटक, हारिस रौफ आणि विराटचे दोन उत्तुंग षटकार
T20 विश्वचषक संपून १५ दिवसांपेक्षा जास्त दिवस उलटले आहेत. फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करून इंग्लंडचा संघ दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन ठरला. ही स्पर्धा जिंकण्याचा प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या भारतीय संघाचा उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पराभव झाला. मात्र, सुपर-१२ मध्ये टीम इंडियाची कामगिरी दमदार होती.
भारताने सुपर-१२ फेरीत पाकिस्तान, बांगलादेश, नेदरलँड आणि झिम्बाब्वेचा पराभव केला. त्याचवेळी भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला. टीम इंडियाने आपल्या मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने केली. हा सामना २३ ऑक्टोबर रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला गेला होता आणि आता एका महिन्यानंतर विराट कोहलीला हा सामना आठवला आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कोहलीने अप्रतिम खेळी खेळून टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता.
या सामन्याबाबत विराटने आज इन्स्टाग्रामवर आहे लिहिले की, २३ ऑक्टोबर हा दिवस माझ्या हृदयात नेहमी खास असेल. क्रिकेटच्या खेळात इतकी ऊर्जा यापूर्वी कधीच जाणवली नव्हती.
किती छान संध्याकाळ होती ती. कोहलीने मेलबर्नमध्ये जवळपास १ लाख प्रेक्षकांसमोर ५३ चेंडूत ८२ धावांची नाबाद खेळी केली होती. टीम इंडियाला विजयी करूनच तो पॅव्हेलियनमध्ये परतला होता. या खास खेळीसाठी त्याला सामनावीराचा पुरस्कारही मिळाला.