solapur

एकच नंबर! आता घरीच पिकवा विषमुक्त भाजीपाला ; सोलापुरात कार्यशाळा

असे म्हटले जाते की,  भाजीपालांमधून सायलेंट विष पसरविण्याचे काम होत आहे. यामुळेही कदाचित माणसांचे आयुष्य घटत असेलही. तसेच दिवसेंदिवस भाजीपाला दरातही वाढ होत असून यामुळे सामान्य कुटुंबासह, मध्यम वर्गातील नागरिकांची कुचंबणा होत आहे. विषमुक्त भाजीपाला लागवड कशी करावी, आणि माती विरहित भाजीपाला लागवड बाबतीतही याची सविस्तरपणे  माहिती व मार्गदर्शन कार्यशाळा रविवार दि. २७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केली आहे अशी माहिती सखी संघमच्या सचिवा ममता मुदगुंडी यांनी दिली. 
सोलापूर शहरात जवळपास ५०० कुटुंबे असतील परसबागेची लागवड करणारे. ‘अनेक कुटुंबांनी दररोज भाज्यांमध्ये लागणारे घटक लागवड केली तर उत्तमच’. सोबत पैशांचीही बचत होईल. यामध्ये हिरवी मिरची, कोथिंबीर, कडीपत्ता, टमाटे, कांदा, यासह इतर अनेक प्रकारच्या हिरव्या भाजीपाला आणि आयुर्वेदिक वनस्पतींचे लागवड कशी करावी हे जाणून घेण्यासाठी माती विरहीत बाग प्रेमीचे संयोजिका सौ. ममता बोलाबत्तीन या माहिती देऊन मार्गदर्शन करणार आहेत. 
चला.. जाणून घेऊया..  
या उपक्रमात महिलांनी जास्तीत संख्येने ‘कन्ना चौक, चौडेश्वरीदेवी मंदिर पाठीमागे, चौडेश्वरी पतपेढी समोर, डॉ. मेतन हाॅस्पिटल शेजारी’ येथे उपस्थित रहावे, तसेच महिलांनी अधिक माहितीसाठी (9175988940) या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन सखी संघमच्या अध्यक्षा माधवी अंदे, उपाध्यक्षा संध्याराणी अन्नम, सचिवा ममता मुदगुंडी, सहसचिवा जमुना इंदापूरे, कार्याध्यक्षा लक्ष्मी चिट्याल, सहकार्याध्यक्षा वैशाली व्यंकटगिरी, खजिनदार प्रभावती मद्दा आणि सहखजिनदार ममता तलकोकूल यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button