top news
रेशनकार्डवर नावात चूक, कुत्र्यासारखे भुंकून तरुणाने केले आंदोलन
सरकारी कागदपत्रांवर एखाद्याच्या नावात चूक झाली तर पुन्हा बदलून घेण्यासाठी बराच खटाटोप करावा लागतो. अनेकदा नावातील चुकीमुळे सरकारी योजनेच्या लाभापासूनही वंचित रहावे लागते. तर काही वेळा नावाचा चुकीचा अर्थही निघतो.
पश्चिम बंगालमध्ये एका तरुणाच्या नावात अशीच काहीशी चूक झाली. रेशनकार्डवर नावात केलेल्या या चुकीची दुरुस्ती व्हावी यासाठी त्याने कुत्र्यासारखे भुंकून आंदोलन केले. अधिकाऱ्यांकडे त्याने भुंकल्यासारखा आवाज काढत आपली कैफियत मांडली.
अखेर अधिकाऱ्यांनी त्याचे नाव बदलून दिले. रेशनकार्डवर तरुणाचे नाव श्रीकांती कुमार दत्ता ऐवजी श्रीकांतु कुमार कुत्ता असे लिहिण्यात आले होते. त्यामुळेच नाव बदलण्यासाठी त्याने कुत्र्यासारखे भुंकत आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. बांकुरा जिल्ह्यातील बिकना इथं राहणाऱ्या श्रीकांती हे बरेच दिवस कुत्र्यासारखे वागत होते. त्यांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.