top news
विराटवर फेक फिल्डिंगचा आरोप हसनला पडणार महागात
- विश्वचषक स्पर्धेत झालेल्या सामन्यात भारतानं बांगलादेशचा पाच धावांनी पराभव केला. या विजयामुळं भारताचा सेमी फायनलमध्ये जाण्याचा मार्ग निश्चित झाला आहे. मात्र, या सामन्यानंतर वाद सुरू झाला आहे.
याचा फटका विराट कोहलीवर फेक फिल्डिंगचा आरोप करणारा बांगलादेशचा क्रिकेटपटू नुरुल हसन याला बसण्याची शक्यता आहे. सामन्यात विराट यानं फेक फिल्डिंग केल्याचा आरोप हसन यानं केला आहे. पंचांनी विराटच्या या कृतीकडं दुर्लक्ष केल्याचंही त्यानं म्हटलं आहे. अर्शदीपनं विराटकडं फेकलेला एक चेंडू नॉन स्ट्रायकर एंडकडे फेकत असल्याचं नाटक विराटनं केलं. प्रत्यक्षात तो चेंडू त्याला पकडताच आला नव्हता.
तेव्हा पंचांनी त्याच्याकडं पाहिलं नाही आणि फलंदाजांनाही हे दिसलं नाही, असं नुरुलनं म्हटलं आहे. ही चूक लक्षात आली असती तर भारताला पेनल्टी लागली असती आणि बांगलादेशला पाच धावा मिळाल्या असत्या. सामन्याचा निकाल वेगळा लागला असता, असं नुरुल यानं म्हटलं आहे.
हसनच्या या आरोपांनंतर वाद सुरू आहे. अर्शदीप डीपवरून चेंडू टाकतो. नुरुलच्या म्हणण्यानुसार, कोहली पॉईंटवर उभा राहून चेंडू पकडण्याचा प्रयत्न करतो व प्रत्यक्षात चेंडू हातात आलेला नसतानाही तो फेकण्याची अॅक्शन करतो. त्यानं असंही म्हटलंय की, हे सगळं होत असताना लिटन दास आणि नजमुल हुसेन शांतो या दोन्ही फलंदाजांनी विराटकडं ढुंकूनही पाहिलं नव्हतं. विराटनं काय केलं हे फलंदाजांना माहीतही नव्हतं.

तसं असेल तर त्यांचं लक्ष विचलित होण्याचा प्रश्नच नाही. नुरुलच्या आरोपात विसंगती आहे. शिवाय, फलंदाजांनी विराटच्या अॅक्शनकडं पाहिलंही नाही हे माहीत असताना फेक फिल्डिंगचा आरोप करणंच चुकीचं आहे, असं बोललं जात आहे. त्यामुळं आयसीसी आता नुरुल हसन यांच्यावरच कारवाई करण्याची शक्यता आहे.