maharashtra
सावे येथील मुलावर आलदर हॉस्पिटल मध्ये मोफत यशस्वी उपचार
सांगोला –
सांगोला तालुक्यातील सावे येथील 12 वर्षाच्या मुलाला बालदम्याचा त्रास होता. या मुलाला ऑक्सीजन प्रक्रिया करून महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतून आलदर हॉस्पिटल येथे मोफत उपचार करण्यात आले.
डॉ. महावीर आलदर (बालरोगतज्ज्ञ) यांनी या बाळावर यशस्वी उपचार मोफत करून डिस्चार्ज दिल्याने नातेवाईक आनंदित झाले व नातेवाईकांनी रुग्णालयात अतिशय उत्तम सुविधा मिळाली ह्याचा अनुभव व्यक्त केला. नातेवाईकांना औषधे व इतर सर्व सुविधा रुग्णायलातून मोफत व उत्तम देण्यात आल्यामुळे नातेवाईकांनी आलदर हॉस्पिटल मधील सर्व डॉक्टर्स व इतर स्टाफचे आभार व्यक्त केले.
तरी सर्व गरजू रुग्णांनी महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ. आलदर यांनी केले आहे.