india worldmaharashtratop news

बापरे… थोडक्यातच वाचला अभिषेक बच्चन; कॅफेमधून बाहेर पडताना डोक्यावर पडलं शटर, काळजाचा ठोका चुकवणारा

बॉलिवूड अभिनेता (Bollywood Actor) अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) गेल्या काही दिवसांपासून पत्नी ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya Rai Bachchan) सोबतच्या घटस्फोटाच्या अफवांमुळे चर्चेत होता. याव्यतिरिक्त आपला अभिनय आणि त्यासोबतच त्याचा खास अपीयरेंस चाहत्यांना नेहमीच भावतो. त्याच्या स्टाईल स्टेटमेंटमुळेही तो नेहमी चर्चेत असतो. पण, सध्या अभिषेक बच्चन चर्चेत आहे, तो त्याच्या व्हायरल होणाऱ्या एका व्हिडीओमुळे (Viral Video). हा व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकेल आणि तुमच्या तोंडून आपोआप अरे बापरे आल्याशिवाय राहणार नाही.

टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यात 2 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात आलेल्या वानखेडे स्टेडियममधल्या टी20 सामन्यासाठी अनेक दिग्गजांनी हजेरी लावली होती. यामध्ये बिग बी अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चनही उपस्थित होते. दोघांच्या उपस्थितीबाबत अनेक चर्चाही सोशल मीडियावर रंगल्याचं पाहायला मिळालं. पण, सामन्यानंतर असं काही झालं की, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला आणि साऱ्यांनाच अभिषेकची चिंता लागून राहिली.

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यानंतर अभिषेक बच्चनसोबत एक भयानक घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, अभिषेक बच्चन मद्रास कॅफेमधून बाहेर येत आहे, पण तेवढ्यात त्याच्या मागून कुणीतरी कॅफेचं शटर बंद करतात. अशातच अभिषेक बच्चनची उंची जास्त असल्यामुळे ते शटर त्याच्या डोक्यावर आदळतं. पण, अभिषेकनं चेहऱ्यावर तसूभरही वेदना दिसू दिल्या नाहीत. तो हसतमुखानं तिथून बाहेर पडला, चाहत्यांना भेटला आणि गाडीत बसून निघून गेला.

दरम्यान, अभिषेक बच्चनचा हा व्हिडीओ पाहून चाहते खूपच आश्चर्यचकित झाले आहेत. या व्हिडीओवर अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. यावर कमेंट करताना एका युजरनं लिहिलंय की, याला म्हणतात प्रेम आणि संस्कृती. शटर इतक्या लवकर बंद झालं, पण चाहत्यांचं त्यानं प्रेमानं स्वागत केलं. तर दुसऱ्यानं लिहिलंय की, हे मान्य करावंच लागेल की, अभिषेक बच्चनला दुखापत झाल्यानंतरही त्यानं कोणतीही वाईट प्रतिक्रिया दिली नाही आणि कोणावरही चिडला नाही. त्याच वेळी, एका युजरनं अभिषेक बच्चनबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

Related Articles

Back to top button