सिंहगड पब्लिक स्कूल, कमलापूर येथे भव्य मल्टी डिसिप्लिनरी एक्झिबिशनचे यशस्वी आयोजन

कमलापूर (वार्ताहर):- सिंहगड पब्लिक स्कूल, कमलापूर येथे आयोजित करण्यात आलेले मल्टी डिसिप्लिनरी एक्झिबिशन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडले.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय श्री.संजय नवले सर, सहसचिव, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ, कमलापूर यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या सोबत सन्माननीय पाहुणे प्रोफेसर डॉ.एस.एच.पवार (संशोधन आणि तंत्रज्ञान विकास केंद्र, सिंहगड इन्स्टिट्यूट सोलापूर) यांची उपस्थिती कार्यक्रमाला विशेष महत्व देणारी ठरली. तसेच सिंहगड संस्था, कमलापूरचे कॅम्पस डायरेक्टर श्री.अशोक नवले सर आणि सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल चैताली मराठे मॅडम यांनी या कार्यक्रमात आपली महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली, ज्याचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विधिवत उद्घाटन करण्यात आले.
विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि कौशल्यांचा अद्वितीय संगम
या एक्झिबिशनमध्ये सिंहगड पब्लिक स्कूल, कमलापूर मधील विद्यार्थ्यांनी विविध विषयांतील सर्जनशील प्रकल्प, शास्त्रीय प्रयोग, आणि नाविन्यपूर्ण तांत्रिक मॉडेल्स सादर केले. विशेष म्हणजे, प्रत्येक वर्गाला त्यांच्या वयानुसार टॉपिक दिले गेले होते. प्री-प्रायमरी ते चौथी इयत्तेपर्यंत वेगवेगळे टॉपिक देण्यात आले होते, तर पाचवी ते नववी इयत्तेपर्यंत वेगळ्या विषयांवर आधारित प्रकल्प सादर करण्यात आले. हे विषय विभागवार आणि विषयानुसार (सब्जेक्ट वाईज) नियोजित होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रमाशी सुसंगत अशा विविध प्रयोग आणि उपक्रम सादर करता आले.
मान्यवरांचे भरभरून कौतुक
कार्यक्रमात श्री.संजय नवले सर आणि प्रोफेसर डॉ. एस. एच. पवार सर, विद्यार्थी पालक व इतर शाळेचे शिक्षक यांनी सिंहगड संस्था, कमलापूरचे कॅम्पस डायरेक्ट श्री अशोक नवले सर, सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल चैताली मराठे मॅडम, शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या प्रयत्नांचे आणि शाळेच्या उत्कृष्ट व्यवस्थापनाचे कौतुक करताना सांगितले की, या शाळेतील शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची सर्जनशीलता आणि मेहनत पाहून आम्ही भारावून गेलो आहोत. हे प्रदर्शन केवळ शाळेच्या यशाचे प्रतीक नाही, तर एक प्रेरणा आहे. मी या विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलता आणि प्रयोग पाहून इतका प्रभावित झालो की, मला ते थेट नॅशनल कॉम्पिटिशनमधील एक्झिबिशनसारखेच भासले. ते पुढे म्हणाले, पुढच्या महिन्यामध्ये सोलापूर येथे राष्ट्रीय परिषद आयोजित केली आहे ज्यामध्ये अनेक शास्त्रज्ञ हजेरी लावणार असून, आम्हाला त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना सहभाग घेण्यासाठी विनंतीपूर्वक अवाहान करण्यात आले, हीच बाब आमच्या विद्यार्थ्यांसाठी कौतुकास्पद व अभिमानाची होती.त्यांच्या या गौरवांच्या शब्दांनी आमच्या विद्यार्थ्यांच्या कौशल्याला राष्ट्रीय स्तरावर पोहोचवले आहे. अशा थोर व्यक्तिमत्वाकडून मिळालेले हे आमंत्रण हे आमच्यासाठी केवळ एक सन्मान नाही तर विद्यार्थ्यांसाठी प्रचंड प्रेरणादायी ठरणार आहे. यापेक्षा मोठे भाग्य किंवा प्रेरणा आमच्या विद्यार्थ्यांसाठी असू शकत नाही.
पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास
पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रकल्पांचे कौतुक करताना हा कार्यक्रम दुसर्या दिवशीही सुरू ठेवण्याची मागणी केली. म्हणून हे प्रदर्शन 31 जानेवारी, 2025 ते 02 फेब्रुवारी, 2025 पर्यंत चालू राहिले. या कार्यक्रमाला तीन दिवसांमध्ये 800 पेक्षा अधिक पालकांनी भेट दिली, तर 2,000 पेक्षा अधिक शालेय विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर दिसणारा आत्मविश्वास आणि त्यांच्या कामावरील अभिमान पाहून संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
शाळेचा नावलौकिक उंचावणारा कार्यक्रम
ही मल्टी डिसिप्लिनरी एक्झिबिशन इतकी यशस्वी ठरली की, सिंहगड पब्लिक स्कूल, कमलापूर चे नाव आता शैक्षणिक गुणवत्तेसाठी अधिक उजळले आहे. विद्यार्थ्यांच्या चमकदार प्रदर्शनाने आणि त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांनी सर्वांचे मन जिंकले.
आयोजकांचे विशेष अभिनंदन
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सिंहगड संस्था, कमलापूरचे कॅम्पस डायरेक्ट श्री अशोक नवले सर, सिंहगड पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल चैताली मराठे मॅडम, सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आणि विद्यार्थ्यांचे विशेष अभिनंदन करण्यात आले. या एक्झिबिशनने विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला नवी दिशा दिली असून, त्यांच्या भावी वाटचालीसाठी एक मजबूत पायाभूत रचना उभी केली आहे.संस्थेचे सहसचिव श्री.संजय नवले यांच्या वतीने या कार्यक्रमातील सर्व सहभागी, आयोजक, आणि विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन! सिंहगड पब्लिक स्कूल, कमलापूर यांचे हे यश अनेक विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहो, अशा शुभेच्छा !