
सांगोला :- शेततळ्यामध्ये पडून 3 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला असल्याची घटना 3 फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली. प्रियांश अजित भोसले (वय-03 वर्षे रा.चोपडी ता.सांगोला जि.सोलापुर) असे मृत्यू पावलेल्या चिमुकल्याचे नाव आहे. घटनेची फिर्याद वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालय सांगोला यांनी दिली आहे.
याबाबत सांगोला पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, प्रियांश अजित भोसले वय-03 वर्षे रा.चोपडी ता.सांगोला जि.सोलापुर हा राहते घराचे जवळ शेततळ्यामध्ये पडल्याने त्यास उपचारा करीता ग्रामीण रूग्णालय सांगोला येथे आणले असता तो उपचारापुर्वीच मयत झालेला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकाँ मोहोळकर हे करीत आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून अकस्मित मृत्यू म्हणून सांगोला पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे.