politicalsolapurtop news

बीड जिल्ह्यातील 24 सरपंच, 820 सदस्यांचे सदस्यत्व रद्द; गावगाडा चालवणाऱ्या लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका

Beed News: बीड जिल्ह्यात गाव गाड्याचा कारभार चालवणाऱ्या सरपंचाला आणि सदस्याला जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी चांगलाच दणका दिला आहे. आत्तापर्यंत जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी 24 सरपंच आणि 820 सदस्य यांचे सदस्यत्व रद्द केल्याची माहिती पुढे आली आहे.

जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी 20 जानेवारी रोजी जिल्ह्यातल्या सात तालुक्यातील 13 सरपंच, तर 418 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले होते. त्यानंतर आता पुन्हा कारवाई करत चार तालुक्यातील 11 सरपंच आणि 402 सदस्यांचे सदस्यत्व रद्द केले आहे. त्यामुळे आत्तापर्यंत 24 सरपंच आणि 820 सदस्यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे.

जिल्ह्यातील 24 सरपंच, 820 सदस्यांचे सदस्यत्व रद्द, नेमकं कारण काय? 

पुढे आलेल्यामाहितीनुसार, 2020 ते 25 या कालावधीत झालेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांनी त्यांचे जात वैधता प्रमाणपत्र विहित मुदतीत सादर केले नाहीत. अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गासाठीच्या राखीव असलेल्या जागांवर निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीस जातीचे प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र निवडून आलेल्या दिनांकापासून बारा महिन्यांच्या कालावधीत सादर करणे आवश्यक आहे. मात्र हे प्रमाणपत्र सादर न केल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे. त्यामुळे गावगाडा चालवणाऱ्या लोकप्रतिनिधींना जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिल्याचे बोलले जात आहे.

Related Articles

Back to top button