सांगोला: शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉ.बाबासाहेब देशमुख व डॉक्टर अनिकेत देशमुख यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत तालुक्यातील विद्यमान दोन्ही नेतृत्वाला कंटाळून डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत शेकाप मध्ये प्रवेश केला.विधानसभा निवडणुकीत डॉ. बाबासाहेब देशमुख यांना कोणत्याही परिस्थितीत आमदार करायचे या ईर्षेने पेटलेल्या यलमर मंगेवाडी गावातील कार्यकर्त्यांनी आबा बापूना रामराम करीत एकदिलाने शेकाप मध्ये प्रवेश केला.
आगामी निवडणुकीला ध्यानात ठेवून प्रस्थापित नेत्यांकडून समाजासमाजात भांडणं लावण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे हे सर्वसामान्य जनतेला दिसतंय. शेतकरी कामगार पक्षाकडून आजपर्यंत असे घाणेरडे राजकारण कधीच केले नाही. शेकाप विरोधी नेतृत्व जेव्हाही सांगोला तालुक्यात बनते, तेव्हा या नेतृत्वाकडून समाजात फूट पाडणे किंवा भांडणे लावणे हा प्रकार झाला आहे. सत्तेशिवाय ही लोक राहू शकत नाही. संगोल्याची प्रतिमा मलिन करणे. जनतेत भ्रम निर्माण करणे हे काम सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे.त्याच प्रमाणे सर्वसामान्य जनतेवर अन्याय वाढल्या मुळे तसेच सर्वसामान्य जनतेमधून शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्या बद्दल मोठी सहानुभूती दिसून येत असल्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत देखील शेतकरी कामगार पक्षाचा दणदणीत विजय होणार असल्यामुळे आम्ही शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला असल्याचे प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांकडून सांगण्यात आले.