maharashtrapoliticalsolapur

आम.शहाजीबापू पाटील यांनी डोंगराएवढी प्रचंड विकास कामे केल्याने मोठ्या मताधिक्याने विजय निश्चित–खासदार श्रीकांत शिंदे 

महुद येथे खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा संपन्न झाली.

सांगोला —

सांगोला तालुक्याचे पाणीदार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचार सभेसाठी झालेली गर्दीही केलेल्या विकास कामाची पोहच पावती आहे. तालुक्यातील शेतीच्या व‌ पिण्याचा पाण्याचा प्रश्न शहाजीबापू पाटील यांनी प्राधान्याने सोडवला व तालुक्याचा दुष्काळ हटवला. महायुती सरकारने सांगोला तालुक्याच्या विकासासाठी 5 हजार कोटीहून अधिक निधी देऊन मोलाचे योगदान दिले .तत्कालीन मुख्यमंत्री व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या कामाची व विकास कामासाठी दिलेल्या निधीची ,योजनांची तुलना करून जनतेने महायुती सरकारला पुन्हा सत्तेवर आणावे. आमदार शहाजीबापू पाटील यांनी तालुक्यात डोंगराएवढी प्रचंड कामे केल्याने त्यांचा विजय निश्चित आहे, असा ठाम विश्वास खासदार श्रीकांत शिंदे यांनी महुद येथील प्रचारसभेत व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर शिवसेना सचिव संजय मशिलकर, शशिकांतभाऊ देशमुख, नवनाथभाऊ पवार ,शिवाजी अण्णा गायकवाड ,राजश्रीताई नागणे पाटील, राणीताई माने, छायाताई मेटकरी,मुबीना मुलाणी, रूकसाना मुजावर ,रविराज शिंदे, अरुण बिले, सागरदादा पाटील, दिग्विजयदादा पाटील, राजू कोळी, भारत चव्हाण, सचिन गायकवाड, महेश साठे, ओंकार लवटे, शिवाजी दिघे, पिंटू इंगोले , डॉ. विजय बाबर, माऊली तेली ,अस्मिर तांबोळी, दुर्योधन हिप्परकर, रामचंद्र ढोबळे, गुंडादादा खटकाळे, अभिजीत नलवडे, अच्युत फुले, दगडू बाबर, आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

253सांगोला विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ मंगळवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी महुद तालुका सांगोला येथे खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा संपन्न झाली.

पुढे बोलताना खा. श्रीकांत शिंदे म्हणाले, महायुती सरकारने सव्वा दोन वर्षाच्या काळात सर्वसामान्यांसाठी मोठ्या प्रमाणात विकासाच्या योजना अमलात आणल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासन आपल्या दारी सारख्या योजना राबवण्यासाठी रात्रंदिवस काम केले. टेंभू, म्हैसाळ, उजनी, जीहे कटापूर आदी पाणी सिंचनाच्या योजनांचे पाणी चालू केले. शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले. तालुक्यातील पीक जळीतासाठी महायुती सरकारने 166 कोटी रुपयांचा निधी शेतकऱ्यांच्या खात्यावर दिला. केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात निधी देऊन महाराष्ट्रातील जनतेला न्याय दिला. तत्कालीन मुख्यमंत्र्यांना जे अडीच वर्षात जमले नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सव्वादोन वर्षात करून दाखवले. यासाठी काम करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असावी लागते.एक रिक्षा चालक, एका शेतकरी कुटुंबातील मुलगा राज्याचा मुख्य मंत्री राज्याचा कारभार चांगल्या पद्धतीने सांभाळू शकतो हे ज्वलंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होय. मुख्यमंत्र्यांना गरीबी विषयी जाणीव असल्याने गरिबाच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवल्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना सर्वसामान्य कुटुंबाला वरदान ठरणारीआहे. मुख्यमंत्री सहायता निधीमधून हजारो कुटुंबांना वैद्यकीय खर्चासाठी मदत केली. महाराष्ट्र राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार सत्तेवर येणार असून शहाजीबापूंना विक्रमी मतांनी निवडून द्या. शहाजीबापू पाटील यांना राज्यात मंत्रिपदाची संधी देऊ असे आश्वासन यावेळी श्रीकांत शिंदे यांनी दिले.

यावेळी आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, तालुक्यातील दुष्काळ संपवण्यासाठी शेतकरी तसेच सर्वसामान्यांना दुष्काळापासून मुक्त करण्यासाठी स्व. आमदार गणपतराव देशमुख यांच्या विरोधात 7 विधानसभा निवडणूका लढवल्या. तालुक्यातील शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला असून भविष्यात मोठी एमआयडीसी आणून बेरोजगार तरुणांना नोकरी देण्याचे नियोजन केले आहे. उर्वरित विकासकामे पूर्ण करायची आहेत. ज्या गावात दीपकआबांचा जन्म झाला ते गावही म्हैसाळ योजनेत त्यांना बसवता आले नाही .हे कामही मला करावे लागले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तालुक्यावर खूप मोठे उपकार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तालुक्यासाठी 5 हजार कोटीहून अधिक निधी देऊन तालुक्याच्या विकासाकरिता चांगली भूमिका बजावली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जे जमले नाही ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करून दाखवले. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना अमलात आणून महिलांना प्रति महिना 1 हजार 500 रुपये देऊन महिलांचा सन्मान केला.पण विरोधकांना पाहवत नाही . राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्री करण्यासाठी व मला आमदार व मंत्री पदाची संधी देण्यासाठी मतदारांनी रात्रीचा दिवस करावा व मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन आमदार शहाजीबापू पाटील यांनी केले .

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख दादासाहेब लवटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा प्रवक्ते ॲड.महादेव कांबळे, आरपीआयचे तालुकाध्यक्ष खंडू सातपुते, भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक दिघे , विद्यार्थी सेनेचे अजिंक्य शिंदे, दत्ताराव नागणे , भीमशक्ती संघटनेचे राज्याध्यक्ष विजय बनसोडे, होलार समाजाचे नेते दीपक ऐवळे, रामचंद्र ढोबळे आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात महायुती शासनाने राज्यात व तालुक्यात केलेल्या विकास कामांची माहिती देत भविष्यात आमदार शहाजीबापू पाटील निवडून येऊन नामदार झाल्यावर तालुक्याचा शंभर टक्के विकास पूर्ण होईल . तालुक्यातील तरुणांच्या, शेतकऱ्यांच्या, कामगारांच्या आशा आकांक्षा पूर्ण होतील. तसेच पाण्याच्या सर्व योजना मार्गी लागून तालुक्यातील शेतकरी समृद्ध होईल व तालुक्यात हरितक्रांती होईल. तरुणांच्या हाताला रोजगार देण्यासाठी मोठ्या एमआयडीसीची व औद्योगिकरणाची गरज आहे . ती शंभरटक्के पूर्ण होणार आहे.

सर्वप्रथम स्व. आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन खासदार श्रीकांत शिंदे व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार शहाजीबापू पाटील यांच्या प्रचारार्थ महूद येथे खासदार श्रीकांत शिंदे यांची भव्य अशी जाहीर सभा संपन्न झाली. या सभेसाठी पदाधिकारी कार्यकर्ते युवा वर्ग मतदार बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते . मोठ्या जल्लोषात खासदार श्रीकांत शिंदे व आमदार शहाजी बापू पाटील यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्ते व सांगोला शहरातील भीमनगर येथील कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला . खासदार श्रीकांत शिंदे व आमदार शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला .उपस्थितांचे स्वागत करून पक्षप्रवेशकांना शुभेच्छा देण्यात आल्या. मोठ्या धाडसाने निवडणुकीला सामोरे जाऊन प्रत्येकाने आपल्या कौशल्यावरती दहा मतदारांना आपल्यासोबत शहाजीबापूंना मतदान देऊन सहकार्य करा असे आवाहन केले.

Related Articles

Back to top button