सांगोला: शेतकरी कामगार पक्षाकडून विधानसभेची जोरदार बांधणी सुरू असताना शेतकरी कामगार पक्षांमध्ये दररोज पक्षप्रवेश घेणाऱ्यांची संख्या वाढत आहे त्यातच आता सांगोला शहरातील पश्चिम भागातील दीपकआबांचे कार्यकर्ते व सांगोला नगरपालिकेचे माजी नगरसेवक विजय राऊत यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांच्या उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षात घर वापसी केल्यामुळे पश्चिम भागात पुन्हा ताकद वाढली आहे.
विजय राऊत यांनी शेतकरी कामगार पक्षात पुन्हा घर वापसी केल्यामुळे दीपक आबांना मोठा धक्का बसला आहे. यावेळी बापू गटाच्या कार्यकर्त्यांनीही शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केल्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला पश्चिम भागातील मोठे बळ मिळाले आहे.
यावेळी चिटणीस दादाशेठ बाबर, मारुतीआबा बनकर, बाळासाहेब एरंडे, डॉ. प्रभाकर माळी, सीए के. एस. माळी, भीमराव राऊत, भारत बनकर, सुरेश माळी, निवृत्ती फुले, गोविंद माळी, अजित गावडे, भीमराव राऊत, सचिन फुले, नीलकंठ लिंगे सर यांच्यासह शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शेतकरी कामगार पक्षात विनायक राऊत, रामचंद्र राऊत, रमेश फुले, अजित फुले, प्रवीण फुले, पवन क्षीररसागर, भारत जाधव, चंद्रकांत फुले, संजय माळी, गणेश नवले, संतोष नवले, तानाजी राऊत, दत्तात्रय फुले, संजय गाडे, रोहित वाघमारे, ऋतुराज यादव, निवृत्ती राऊत, भारत राऊत, मोहन राऊत, हणमंत राऊत, आर.ए.बनकर यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात घरवापसी केली