maharashtrapoliticalsolapur

तुम्ही फक्त दिपकआबांना आमदार करा तुमचा एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही 

सांगोल्याच्या अतिविराट सभेत उद्धवसाहेब ठाकरे यांचे जनतेला अभिवचन

रेकॉर्डब्रेक गर्दी, उत्साहाला उधान ; दिपकआबांच्या एका हाकेवर जमला ५० हजारांचा जनसमुदाय

 

सांगोला : तालुका प्रतिनिधी

२०१९ रोजी झालेल्या विधानसभा निवडणुकीतच मी शिवसेना पक्षाकडून दिपकआबा साळुंखे पाटील यांना उमेदवारी देणार होतो परंतु काही कारणास्तव मी त्यांना उमेदवारी देऊ शकलो नाही. २०१९ ला शिवसेनेचा आमदार निवडून आणणार असा त्यांनी मला शब्द दिला होता. सर्वसामान्य जनतेसाठी लढणारे दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासारखे सैनिक मला आणि संपूर्ण महाराष्ट्राला आवडतात. सांगोला विधानसभा मतदारसंघातील जनतेने फक्त दिपकआबा साळुंखे पाटील यांना आमदार करावे सांगोला तालुक्यातील जनतेच्या मनात असणाऱ्या एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही असे अभिवचन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी तमाम सांगोलकरांना दिले.

 

२५३ सांगोला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या प्रचारार्थ सांगोला येथे आयोजित केलेल्या अतिविराट सभेला संबोधित करताना उद्धवसाहेब ठाकरे बोलत होते. सांगोला तालुक्याच्या राजकीय इतिहासातील ही ऐतिहासिक आणि रेकॉर्डब्रेक सभा ठरली. या अतिविराट आणि भव्यदिव्य सभेसाठी दिपकआबा साळुंखे पाटील यांच्या एका हाकेवर तब्बल ५० हजार सांगोलकरांनी या सभेला उपस्थिती दर्शविल्याने सबंध राज्यभर या सभेची चर्चा रंगली. सांगोला विधानसभा मतदारसंघातील धनगर समाज बांधवांनी काठी घोंगडं आणि ढोल देऊन उद्धवसाहेब ठाकरे यांचा सत्कार केला.

सांगोला येथील या अतिविराट आणि रेकॉर्ड ब्रेक सभेला उद्देशून बोलताना उद्धवसाहेब ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राचा इतिहास आहे, हा महाराष्ट्र कधीही गद्दाराला क्षमा करत नाही. इथल्या गद्दाराने गुवाहाटीचा डोंगर पाहिला. पण इथल्या रायगडाचं टकमक टोक नाही पाहिलं. सांगोला तालुक्यातील सुजान जनता याच गद्दारांना २३ तारखेला रायगडचे टकमक टोक दाखवेल असेही यावेळी उद्धवसाहेब ठाकरे म्हणाले. गद्दारांच्या छताडावर भगवा रोवायला मी सांगोल्यात आलो आहे. येत्या २३ तारखेला सांगोल्याची जनता गद्दाराचा कडेलोट करेल आणि 24 तास जनतेची प्रामाणिकपणे सेवा करणारा दिपकआबा साळुंखे पाटील यांच्यासारखा सैनिक महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवेल असा विश्वास व्यक्त करताना खेड शिवापूर येथील टोल नाक्यावर एकाची पैशाची गाडी सापडली होती, त्यात २५ कोटी होते पण ५ कोटी रुपये दाखवले. सांगोला तालुक्यातील जनता ही स्वाभिमानी आहे ती कदापी विकली जाणार नाही. स्वाभिमानी सांगोलकर २० नोव्हेंबर रोजी मशालीचे बटन दाबून नक्कीच दिपकआबांना प्रचंड मतांनी विजयी करतील आणि शहाजीबापू पाटील यांना कायमस्वरुपी घरी बसावतील असा विश्वासही शेवटी उद्धवसाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील म्हणाले, ३०-३५ वर्षाच्या काळात जात पात बाजूला ठेवून १८-१८ तास काम केले आहे. आघाडीच्या राजकारणात शेकापच्या गणपतराव देशमुख यांना प्रामाणिकपणे साथ दिली. या वेळेला मला साथ द्या अशी देशमुख बंधूसह शहाजीबापू यांना विनंती केली होती. मात्र, त्यांनी पाठिंबा देण्यास नकार दिला. महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार असून उध्दव ठाकरे हेच मुख्यमंत्री होणार आहेत. सुशिक्षित बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी एमआयडीसी आणण्यासाठी प्रयत्नशील आहे. सांगोला तालुका टेलला असल्याने टेंभू, म्हैसाळ, निरा उजवा कालव्याचे हक्काचे पाणी देण्याचा कायदा करावा. डाळिंब प्रक्रिया उद्योग सांगोल्यात आणावा. दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी ४० रुपयांचा हमीभाव मिळावा. गलाई उद्योगाला सूक्ष्म व लघु उद्योगाचा दर्जा द्यावा, धनगर समाजाला मडग्याळ मेंढी प्रजनन केंद्र स्थापन करावे. महिलांच्या बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी स्व.मीनाताई ठाकरे उद्योग भवनची निर्मिती करावी. प्रत्येक महामंडळाला ५०० कोटी रुपयांची तरतूद करावी अशी मागणी केली. उमेदवार दिपकआबांच्या भाषणाचा धागा पकडून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगोला तालुक्यातील एकही प्रश्न शिल्लक ठेवणार नाही असे अभिवचन सांगोलकरांना दिले.

 

 

यावेळी शिवसेना उपनेते शरद कोळी, साईनाथभाऊ अभंगराव,शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.सी.झपके, तुषार इंगळे, चंद्रकांत करांडे, चंद्रकांत चौगुले, शिवाजीनाना बनकर, नवनाथ मोरे, अजित देवकते, रणजीत बागल, मंगेश मस्के,रवींद्र कांबळे आदीसह अन्य मान्यवरांनी आपले विचार मांडताना शहाजीबापू पाटील यांच्यावर तोफ डागली. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, गणेश वानकर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.सी.झपके, रणजित बागल, तानाजीकाका पाटील, शिवसेना जेष्ठ नेते साईनाथ अभंगराव, शिवसेना उपनेते शरद कोळी, जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अभिषेक कांबळे, शिवसेना तालुकाप्रमुख अरविंद पाटील, शहर प्रमुख तुषार इंगळे, अनिलनाना खटकाळे, योगेश खटकाळे, शिवाजीनाना बनकर, सूर्यकांत घाडगे, नवनाथ मोरे, विनोद रणदिवे, सूर्याजी खटकाळे, भारत गवळी, मधुकर बनसोडे, नितीन रणदिवे, अनिल खडतरे, विजयदादा येलपले, जयमाला गायकवाड, दिलीप मोटे, अनिल मोटे, यशराजे साळुंखे पाटील, डॉ. धनजंय पवार, शाहूराजे मेटकरी, राजेंद्र देशमुख, बिरा पुकळे, शिवाजी जावीर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि तब्बल ५० हजारहून अधिक जनसमुदाय उपस्थित होता.

 

 दिपकआबाच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ; उद्धवसाहेब ठाकरे गरजले

 

सांगोला विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार हे दिपकआबा साळुंखे पाटील हेच राहतील. यामध्ये कुणी चेल्या चपाट्यांनी हस्तक्षेप करू नये. ज्यांनी शिवसेनेशी आणि महाविकास आघाडीशी गद्दारी केली त्या सर्वांना घरी बसवून तालुक्यातील सुज्ञ मतदार सांगोला तालुक्यावर महाविकास आघाडीचा झेंडा आणि शिवसेनेचा भगवा फडकवतील असा विश्वास पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी व्यक्त केला.

 

दिपकआबाच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ; उद्धवसाहेब ठाकरे गरजले 

गेली 30 ते 35 वर्ष मी सांगोला तालुक्याच्या राजकीय सामाजिक जीवनात काम करत आहे तालुक्यातील जनतेचे प्रश्न मला नेमकेपणाने माहीत आहेत सर्वसामान्य जनतेच्या सुख दुःखात मी कायम सहभागी असतो. आघाडीच्या राजकारणात आजवर फक्त माझा वापर झाला आणि माझ्यावर अन्याय झाला परंतु 35 वर्षांच्या राजकारणात परिणामाची परवा न करता खऱ्या अर्थाने उद्धव साहेब ठाकरे आणि शिवसेनेने आपल्याला न्याय दिला साहेब तुम्ही फक्त मला ताकद द्या मी सांगोला विधानसभा मतदारसंघाचा चेहरा मोहराच बदलून टाकतो

; दिपकआबा साळुंखे पाटील 

उमेदवार 253 सांगोला विधानसभा मतदारसंघ

 

Related Articles

Back to top button