ट्रकला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न नडला; कॉलेज तरुणीसह दोघांचा जागीच मृत्यू
हल्ली सोलापूरसह अन्य जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान आज अमरावती जिल्ह्यात मोठा अपघात झाला आहे. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात कॉलेज तरुणीसह तिच्या एका मित्राचा अपघात झाला.
हा प्रयत्न त्यांच्या अंगलट आला आणि या अपघातात त्या दोघांचा जागीच मृत्यू झाला. अमरावती महामार्गावरील कोंडेश्वर ते बडनेरा रस्त्याच्या दरम्यान हा अपघात घडला. यामध्ये कॉलेज तरुणी गौरी नामावली व तिचा मित्र आदित्य विश्वकर्मा यांचा जागीच मृत्यू झाला. 17 वर्षीय गौरी कॉलेजला जाते, असे सांगून घरातून निघाली.
वास्तविक गौरी तिच्या मित्राबरोबर फिरायला गेली होती. ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या नादात रस्त्यावर उभ्या असलेल्या वाहनाला त्यांची कार धडकली. हा अपघात भीषण होता. कारण या अपघातात कार गाडीचा पूर्णतः चक्काचूर झाला. महामार्गावर गाडी चालवताना वाहनधारकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.