सांगोला येथे दुचाकी व मालट्रक च्या अपघातामध्ये शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू
सांगोला :
दुचाकी व मालट्रक च्या झालेल्या अपघातामध्ये दुचाकी वरील १७ वर्षीय शालेय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक ३० रोजी सांगोला पंढरपूर रोड जवळील बायपास जवळ घडली आहे. अमर दिघे, असे अपघातामध्ये मृत्यू झालेल्या शालेय विद्यार्थ्यांचे नाव आहे.
याबाबत गावातील नागरिकाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, अमर दिघे हा विद्यार्थी सांगोल्या वरून घराकडे जाण्यासाठी निघाला असता सांगोला पंढरपूर रोड जवळील बायपास वरून वाढेगाव येथील त्याच्या घराकडे निघाला होता. बायपास जवळ मालट्रक ची दुचाकीला धडक झाली आणि हा अपघात घडला असल्याचे गावातील नागरिक सांगत आहेत. यामध्ये अपघातानंतर बंडू दिघे यांनी १०८ अॅम्बुलन्स ने उपचाराकरिता सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तो मयत झाला असल्याचे सांगितले.
याबाबत डॉ. उत्तम फुले यांनी खबर दिली असून त्यानुसार सांगोला पोलिसात नोंद करण्यात आली आहे. पुढील घटनेचा तपास पो.बनसोडे करीत आहेत.