maharashtrapoliticaltop news

दिपकआबा साळुंखे पाटील पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर..?

आबा पुन्हा स्वगृही परत जाऊ ; आबाप्रेमी कार्यकर्त्यांचा दिपकआबांना आग्रह

सांगोला :

सांगोला विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील यांनी पुन्हा स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत जावे यासाठी आता दिपकआबाप्रेमी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार असूनही महाविकास आघाडी मधील घटक पक्षांनी आपली फसवणूक केली त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत आपला पराभव झाला त्यामुळे आपण आता महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात न थांबता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय व्हावे अशी आग्रही मागणी डॉ राज मिसाळ यांनी केली आहे.

 

पराभवाचे चिंतन करण्यासाठी नुकत्याच सांगोला येथे आयोजित केलेल्या बैठकीत सांगोला विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी दिपक आबा साळुंखे पाटील यांनी पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सक्रिय व्हावे असा आग्रह केला. बैठकीत ज्येष्ठ नेते तानाजीकाका पाटील, आर डी पवार, पियुष साळुंखे, शिवाजी बनकर, शिवाजी कोळेकर, राज मिसाळ, संभाजी हरिहर, अजित देवकते, नितीन रणदिवे, विजय इंगवले, भारत नागणे, रफिक काझी, प्रा अनिल नवत्रे आदींसह प्रमुख कार्यकर्त्यांनी आपले मनोगत व्यक्त करताना माजी आमदार दिपकआबा साळुंखे यांनी आपल्याला फसवणाऱ्या महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असा आग्रह धरला. या चिंतन बैठकीत दिपकआबांनी कार्यकर्त्यांच्या भावनांचा आणि भूमिकेचा आदर करूनच पुढील राजकीय भूमिका ठरविणार असल्याचे सांगितल्याने दिपकआबा पुन्हा स्वगृह परतणार असल्याचे या बैठकीतून संकेत मिळाले आहेत.

 

कामाचा माणूस अजितदादांचे नेतृत्व स्वीकारा 

राज्यात ज्या पद्धतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे प्रचंड कामाचा माणूस म्हणून ओळखले जातात. त्याच पद्धतीने सांगोला तालुक्यात आणि सोलापूर जिल्ह्यात माजी आमदार दिपकआबा साळुंखे पाटील हे प्रचंड कामाचा माणूस म्हणून ओळखले जातात म्हणून सांगोला तालुक्यातील सर्व सामान्य जनतेच्या भावनेचा आदर करून आणि सर्वसामान्य जनतेची कामे मार्गी लावण्यासाठी दिपकआबांनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा स्वगृही परत जावे ;

डॉ राज मिसाळ, युवा नेते, सांगोला.

Related Articles

Back to top button