टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मंत्री व्हायचंय का? सभागृहात ठाकरेंच्या आमदाराला फडणवीसांनी दिली ऑफर

Follow Us:

विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरूवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेत विविध मुद्द्यांवरून शिंदे सरकारला कोंडित पकडण्याचा प्रयत्न केला. ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी राज्यमंत्र्यांच्या बंगल्यांच्या रंगरंगोटीवरुन सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.

यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं.
प्रभू यांनी हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. विद्यमान स्थितीत राज्य सरकारमध्ये एकही राज्यमंत्री नसताना नागपूर अधिवेशनात राज्यमंत्र्यांचे सगळे बंगले सजवले गेलेले आहे. ज्या बंगल्याची आत्ता आवश्यकता नाही, असे प्रभू म्हणाले.
प्रत्येक अधिवेशनात अशी रंगरंगोटी होत असते आणि त्याचा खर्च लाखो-करोडो वगैरे नसतो. पाहिजे तर आपल्याला खर्चाचा हिशेब पाठवतो, असे फडणवीस म्हणाले. प्रभू यांनी बंगल्यांच्या रंगरंगोटीवरुन सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. पण फडणवीसांच्या बिनतोड युक्तिवादापुढे त्यांचा मुद्दा तोकडा पडला. दुसरीकडे तुम्हाला मंत्री व्हायचंय का? अशी विचारणा केला. फडणवीसांनी प्रभूंना दिलेल्या खुल्या ऑफरनंतर सभागृहात खसखस पिकली.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

BJP-Sharad Pawar NCP : भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आले एकत्र, नगरपालिकेत फिरला गेम

शरद पवारांचा पक्ष फूटणार का? आमदार, खासदार…देवेंद्र फडणवीसांनी A टू Z सांगून टाकलं; सस्पेन्स संपला!

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंपाचे संकेत! जयंत पाटील अन् विनोद तावडे यांची मुंबईत भेट, शरद पवारांच्या राष्ट्रवादीची नवीन चाचपणी?

पुन्हा प्रेम जुळणं कठीण, आम्ही दुसरं लग्न केलं आता…, फडणवीस ठाकरेंबद्दल काय म्हणाले?

शिवसेनेची ताकद वाढली; सचिन अहिर यांच्यानंतर आणखी एक आमदार फुटला, शिंदे म्हणाले….

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र येणार? ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया.. पुन्हा महाराष्ट्रात राजकीय उलथापालथ?